7 October 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 7 ऑक्टोबरला सोमवार असून नवरात्रीचा सहावा दिवस आहे. सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकारी पूजा केल्यानं सुख समृद्धी प्राप्त होते. ज्योतिष गणनेनुसार,7 ऑक्टोबर 2024 ला कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
मेष
नोकरी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. पैशांसाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना कुटुंबाचं सहकार्य मिळेल.
वृषभ
करिअरमध्ये नवीन ओळख निर्माण करू शकता. मन प्रसन्न राहील. कुणाशी बोलताना सावध राहा. नोकरीत उत्तम संधी मिळू शकते. पार्टनरचा सपोर्ट राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
मिथुन
करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं. मनात चिंता निर्माण होऊ शकते. संयम ठेवा. विनाकारण क्रोधीत राहू नका. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क
मन चिंताग्रस्त राहील. कामकाजात प्रगती होईल. कौटुंबीक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. वडिलांचं सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.
सिंह
आज संध्याकाळपर्यंत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अन अशांत राहील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. आज व्यापारी पैसै कमावण्यात यशस्वी होतील.
कन्या
आज तुम्हाला पैसै कमवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कार्यस्थळी कठीण काम केल्यानं प्रसन्न राहाल. विद्यार्थ्यांनी लक्ष गाठण्यासाठी अथक प्रयत्न करा.
तुळा
तुम्ही केलेला विचार लागू करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मनात चढ-उतार निर्माण होईल. नोकरीत अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. आज तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ शकतो.
वृश्चिक
आज एखाद्या सामाजिक कार्यात तुमची महत्त्वाच्या लोकांशी ओळख होऊ शकते. आत्मविश्वास कमी राहील. मन अशांत राहील. विनाकारण क्रोधीत होऊ नका. बोलताना संवाद ठेवा. आरोग्य सुधारेल. आर्थिक गोष्टीत तुमचा दिवस चांगला राहील. आज तुमच्याकडे पैसे येतील.
धनु राशी
तुमच्यापैकी बहुतांश लोक आजच्या दिवसाचा आनंद लुटू शकता. काही कामांचं प्लॅन असल्यास रचनात्मक विचार करा. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. विंडो शॉपिंक किंवा एखाद्या प्रदर्शनात भाग घेऊ शकता.
मकर
तुम्ही आज तुमच्या मित्रांसोबत आठवड्यातील सुट्टी एन्जॉय करून आरोग्य चांगलं ठेवू शकता. तसच तुम्ही जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी पायाने चालू शकता.
कुंभ
आज तुमची आर्थिक स्थिती स्थीर राहील. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसाठी काही महागड्या वस्तू खरेदी करू शकता. तुमच्यापैकी काही लोक आकर्षक संपत्तीचा सौदाही करू शकता.
मीन
राशींच्या व्यक्तींना ज्या गोष्टींची अपेक्षा आहे, त्याबाबत सावध राहा. कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा. विवाहित लोकांसाठी आणि इतर गोष्टी व्यवस्थित पार पाडण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.
ADVERTISEMENT