Ladki Bahin Yojana Date Extended 2024: आता 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख, मिळणार थेट 4500 रुपये..

मुंबई तक

04 Sep 2024 (अपडेटेड: 04 Sep 2024, 02:02 PM)

Ladki Bahin Yojana application last date: माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तारीख सरकारकडून वाढविण्यात आली असून त्याचा बराचसा फायदा हा राज्यातील महिलांना होणार आहे.

'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख, मिळणार थेट 4500 रुपये..

'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख, मिळणार थेट 4500 रुपये..

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली

point

शिंदे सरकारने घेतला तारीख वाढविण्याचा निर्णय

point

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर लवकर करा अर्ज

Ladki Bahin Yojana Date Extended 2024: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही किंवा ज्यांचा अर्ज नाकारण्यात आला आहे अशा सर्व महिला आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. (mazi ladki bahin yojana date extended 2024 rs 4500 will be received directly)

हे वाचलं का?

या योजनेंतर्गत, पहिल्या दोन महिन्यांचा 3000 रुपयांचा हप्ता थेट DBT द्वारे अनेक महिलांच्या बँक खात्यांवर पाठविला गेला आहे. 29 ऑगस्ट रोजी 50 लाख महिलांच्या बँक खात्यांवर पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर लवकर अर्ज करा. तुम्ही नारी शक्ती ॲप्लिकेशन आणि योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: शिंदे सरकारचा आणखी मोठा निर्णय, अर्ज करण्याची तारीखच...

Ladki Bahin Yojana Date Extended

आर्टिकल

Ladki Bahin Yojana Date Extended

योजनेचं नाव

माझी लाडकी बहीण योजना

कोणी केली सुरू

महाराष्ट्र सरकार

लाभार्थी

महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्षांवरील सर्व पात्र महिला

राज्य

महाराष्ट्र

लाभ

लाभार्थी महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये

उद्देश

महिलांची आर्थिक स्थिती सुधारणं

वर्ष

2024

अर्जाची प्रक्रिया

ऑनलाइन/ऑफलाइन

नारी शक्ती दूत App लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=en

अधिकृत वेबसाइट

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2024

माझी लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख का वाढवली?

राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. या योजनेअंतर्गत, 14 ऑगस्ट रोजी 1 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर 3000 रुपयांचा पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात 3000 रुपयांचा पहिला हप्ता 29 ऑगस्ट रोजी 50 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर पाठवण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारचा प्रचंड मोठा निर्णय, थेट GR करा डाऊनलोड!

अजूनही 27 लाखांहून अधिक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले असले तरी अद्याप महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही. सर्व महिलांना प्रथम त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल. यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत या सर्व महिलांच्या बँक खात्यात 3 महिन्यांचा हप्ता हा एकाच वेळी जमा होईल. दरम्यान, राज्यातील अनेक महिला या योजनेसाठी अद्यापही अर्ज करू शकल्या नाहीत, त्यामुळेच आता सरकारने अर्जाची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 ऐवजी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत केली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता

  1. महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  2. महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
  3. महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे नसावेत.
  4. महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
  5. या योजनेसाठी केवळ विवाहित, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलाच अर्ज करू शकतात.
  6. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं

  1. आधार कार्ड
  2. मतदार ओळखपत्र
  3. मोबाइल नंबर
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. बँक पासबुक
  6. डोमेसाईल प्रमाणपत्र
  7. रेशनकार्ड
  8. स्वयंघोषणा फॉर्म (हमीपत्र)
  9. अर्ज फॉर्म

 

Ladki Bahin Yojana Important Dates

योजनेची घोषणा

शिंदे सरकार

अर्जाची सुरुवात

1 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 जुलै 2024

मसुदा निवड यादी

16 ते 20 जुलै 

प्रारूप यादीवर हरकती, तक्रार

21 ते 30 जुलै

लाडकी बहीण योजना यादी

1 ऑगस्ट

या योजनेचा लाभ

14 ऑगस्टपासून

लाडकी बहीण योजना Last Date

31 ऑगस्ट 2024

Ladki Bahin Yojana Last Date Extended

30 सप्टेंबर 2024

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही ऑफलाइन पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट आणि नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून ऑनलाइन अर्ज करू शकता. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 57 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

    follow whatsapp