Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!

भागवत हिरेकर

09 Jul 2024 (अपडेटेड: 09 Jul 2024, 11:51 AM)

Ladki bahin yojana documents list in marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. पर्यायी कागदपत्रे कोणती देता येईल, याबद्दल सगळी माहिती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे?

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवीत?

point

उत्पन्नाचा दाखला नसेल, तर कोणते प्रमाणपत्र हवे?

point

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर काय करायचं?

ladki bahin yojana documents required : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू झाली आहे. १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे. योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना १ जुलैपासून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज करताना चूक झाली किंवा कागदपत्रे चुकीची दिली तर योजनेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यामुळे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. तेच समजून घ्या... (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required Documents)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर सरकारने नियमांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. तसा शासना निर्णयही काढण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्या सुधारणा केल्या आहेत आणि पर्यायी कागदपत्रे कोणती द्यावी लागणार?

माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे 

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असावी. त्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र वा जन्म दाखला प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. 

हेही वाचा >> Mazi ladki bahin yojana online form : एक रुपयाही खर्च न करता घरीच भरा अर्ज!

शासनाने या नियमामध्ये सुधारणा केली आहे. सुधारित निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर त्याऐवजी अर्जदाराचे १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल करण्यात आल्यानंतरचा शासन निर्णय.

दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असल्यास, तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. 

1) आधार कार्ड

2) बँक पासबुकची झेरॉक्स

3) उत्पन्नाचा दाखला

4) रहिवाशी प्रमाणपत्र

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, याबद्दलची माहिती देणारा शासन निर्णय.

उत्पन्नाची अट, कोणते कागदपत्रे द्यावे लागणार?

योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न २५०००० पेक्षा जास्त नसावे अशी अट सरकारने घातलेली आहे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना 

पण, सक्षम अधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला नसेल, तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आवश्यक असणार आहे. पिवळे रेशन कार्ड आणि केशर रेशन कार्ड धारक महिलांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल, तर उत्पन्न दाखला प्रमाणपत्राची गरज नाही. पण, यातील एकही कागदपत्र कमी असेल, तर तुमचा अर्ज बाद होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी महिला या योजनेसाठी अर्ज करत आहे, तिचे बँकेत खाते असेलच पाहिजे. ते नसेल तर अपात्र ठरवले जाईल.

    follow whatsapp