Eknath Shinde Press Conference live : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलंय. भाजपचे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देतील, अशी तुफान चर्चा रंगलीय. अशातच एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. यावेळी शिंदे म्हणाले, "मी स्वत: काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांना फोन करून सांगितलं की, सरकार बनवताना निर्णय घेताना... कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा इतर कुणामुळे हे अजिबात मनात आणू नका.
ADVERTISEMENT
तुम्ही आम्हाला मदत केलेली, तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली. जनतेचा विकास करण्यासाठी संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या.. तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भाजपसाठी अंतिम असतो तसाच आम्हालाही अंतिम आहे. त्यामुळे निर्णय घेताना तुम्ही असं वाटून नका घेऊ की, माझी अडचण आहे का. तर बिलकुल नाही.. त्यामुळे मी काल मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना फोन केला.. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या. तुम्ही सरकार बनवताना मनात काही ठेवू नका.. तुम्ही सरकार बनवताना जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या. तो मला मान्य असेल.
शिंदे पुढे म्हणाले, कुठलीही कोंडी राहू नये यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे. भाजपचं वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल मुख्यमंत्री बनविण्यासाठी.. त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, पाठिंबा आहे. मी कालच त्यांना सांगितलं आहे की, जो निर्णय तुम्ही घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. त्यामुळे कुठलीही कोंडी, अडसर नाराजी असं काही नाही. म्हणून जो निर्णय मोदी-शाह साहेब घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असंही शिंदे म्हणाले.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला?
लोकांची भावना साहजिक आहे.. मला मुख्यमंत्री करण्याचे.. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी जे निर्णय घेतले ते त्यांना माहिती आहे.आम्ही महायुतीचे लोकं आहोत. आम्हाला त्यांनी अडीच वर्ष पाठिंबा दिला होता ना.. आता भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याला आणि त्यांच्या उमेदवाराला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असंही मोठं विधान शिंदेंनी केलं.
मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. हा अतिशय मोठा विजय आहे. त्यामुळे जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलंय आणि महायुतीवर जो विश्वास दाखवला आहे. एकीकडे विकासकामं आम्ही पुढे नेली. अनेक प्रकल्प सुरू झाली. तसंच कल्याणकारी योजनाही. विकासकामं आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. आम्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन-तीन तास झोपायचो नंतर पुन्हा सभा घ्यायची. मी 80-90 सभा महाराष्ट्रात घेतल्या. मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. तसंच काम मी केलं, करत राहीन, असंही शिंदे म्हणाले.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?
शिंदे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, मला आठवतंय की, आम्ही उठाव केला तेव्हा मोदी-शाह म्हणा. मी आपल्याला सांगू इच्छितो.. की, आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतपर्यंत आम्ही घेतलेले निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेले नव्हते. त्यामुळे आज मी पाहतोय की, राज्याचा प्रंचड असा वेग आहे. राज्य एक नंबरला नेण्याचं काम आम्ही केलंय. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला तो केवळ आम्ही काम केलं, निर्णय घेतले जी सकारत्मकता दाखवली त्यामुळे मतांचा वर्षाव झाला.मी जनतेसाठी एक निश्चिय केला होता की, कॉमन मॅनसाठी काही तरी केलं पाहिजे.
सर्व सामान्य कुटुंबाच्या वेदना मी पाहिला आहे.हे सगळं माझ्या डोक्यात होतं. तेव्हा मी ठरवलं की, माझ्याकडे जेव्हा असा अधिकार येईल तेव्हा लाडकी बहीण असेल, लाडके भाऊ असेल.. त्यांच्यासाठी काही करेल. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मी लाडका भाऊ झालो.आम्ही डोंगराप्रमाणे तुमच्या मागे उभे राहू. त्यांनी मुख्यमंत्री केलं त्यानंतर प्रत्येक दिवस त्यांनी आम्हाला खंबीरपणे मदत केली. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे आहोत.. एवढा मोठा विजय झाला. आजपर्यंतचा हा ऐतिहासिक विजय झाला. जीव तोडून आम्ही काम केलं, निर्णय घेतले. "जे काही आता सगळं या राज्यामध्ये एवढं बहुमत आलं. मग कुठे घोडं आडलं, पण कुठेही घोडं वैगरे आडलेलं नाही. मी अगदी मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही धरून ठेवलं, ताणून ठेवलं.. अशातला माणूस नाही. मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ हे पद आहे. नवीन ओळख जी आहे ती नशीबाने मिळते, असंही शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT