Amit Thackeray: शिंदे सरकार असताना भोंग्याचा मुद्दा का लावून धरला नाही? अमित ठाकरे म्हणाले तुम्ही...

मुंबई तक

27 Oct 2024 (अपडेटेड: 27 Oct 2024, 05:59 PM)

मुंबई तकच्या चावडीवर आलेल्या अमित ठाकरे यांनी मतदासंघासाठी व्हिजन स्पष्ट केलं आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी भोंग्याबद्दल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या काळात उपस्थित केलेला मुद्दा पुढे का लावून धरला नाही? असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरेंनी त्याचं उत्तर दिलं.

अमित ठाकरे मुंबई तक चावडीवर

अमित ठाकरे मुंबई तक चावडीवर

follow google news

बातम्या हायलाइट

point

भोंग्याच्या मुद्द्यावर काय म्हणाले अमित ठाकरे?

point

राज ठाकरेंवरील आरोपांना अमित ठाकरेंकडून उत्तर

point

अमित ठाकरे यांच्यावर किती गुन्हे दाखल?

Maharashtra Vidhan Sabha मुंबई : विधानसभेच्या मैदानात यंदा अनेक पक्ष उतरलेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक ठाकरे आणि पवारांसाठी आव्हानात्म आहे. तर दुसरीकडे आणखी एक ठाकरे या निवडणुकीत उतरले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला खळखट्याक पर्व देणारे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिरंजीव या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. अमित ठाकरे हे माहिम विधानसभेतून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याच निमित्ताने मुंबई तकच्या चावडीवर आलेल्या अमित ठाकरे यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलं आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी भोंग्याबद्दल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या काळात उपस्थित केलेला मुद्दा पुढे का लावून धरला नाही? असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरेंनी त्याचं उत्तर दिलं. (Amit Thackeray Interview on Mumbai Tak Chawadi amid Assembly Elections 2024)

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>NCP Rap Song Video : सत्तेच्या लालसेने गद्दारीचा पदर धरला... शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रॅप साँगचा धुमाकूळ

 

मनसेच्या एका सभेतून राज ठाकरे यांनी मशि‍दींवरील भोंग्यांच्या आवाजाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुन राज्याच्या काही भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घडामोडींनंतरच काही काळात राज्यात महायुतीचं सरकार आलं. यावेळी राज ठाकरे यांनी हा मुद्दा लावून धरला नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी हा मुद्दा तसाच आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी फक्त उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला होता का असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, त्या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करत आलो आहोत. अजूनही मी जिथे जिथे जातो तिथे भोंग्याचा आवाज जास्त असेल, तर स्थानिक पोलिसांना संपर्क साधून कारवाईची मागणी करतो. मात्र तरीही तो प्रश्न सूटत नसेल तर तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. 

 

अमित ठाकरेंवर किती गुन्हे दाखल?

हे ही वाचा >>NCP Sharad Pawar Party Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिकांच्या लेकीविरोघात दिला 'हा' उमेदवार

 

राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राज्यात अनेक मनसैनिक रस्त्यावर उतरायचे, आंदोलनांमध्ये तोडफोड, जाळपोळ व्हायची, यात कित्येक मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंच्या मुलावर किती गुन्हे दाखल असा प्रश्न विचारला गेला. यावेळी अमित ठाकरे यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नाही असं सांगितलं. भरपूर आंदोलनं केली, या सर्व गोष्टींसाठी आपण तयारही होतो, मात्र अद्याप आपल्यावर एकही गुन्हा दाखल नाही, भविष्यात जर संघर्ष करावा लागला तर आपण तयार आहोत असंही अमित ठाकरे यांनी सांगितलं. 

मुंबई Tak 'चावडी'वरची अमित ठाकरेंची संपूर्ण मुलाखत पाहा आमच्या युट्यूब चॅनलवर.

    follow whatsapp