Eknath Shinde News: "एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, कारण...", शिवसेनेच्या 'या' नेत्यानं सांगितलं सर्व प्लॅनिंग

नरेश शेंडे

28 Nov 2024 (अपडेटेड: 28 Nov 2024, 07:13 PM)

Eknath Shinde Latest News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंबाबत मोठं विधान

point

"शिंदे कॅबिनेटमध्ये असतीलच, पण..."

point

उपमुख्यमंत्रीपदाबाबत नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde Latest News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. अशातच शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार करणार नाहीत. शिंदे कॅबिनेटमध्ये असतीलच. पण ते उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. 

हे वाचलं का?

संजय शिरसाट यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं, "एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. जे मुख्यमंत्री राहिले आहेत, अशा नेत्यावर अशाप्रकारची जबाबदारी सूट होत नाही. राज्य सरकारमध्ये शिवसेनेकडून दुसऱ्या एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री केलं जाईल". पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्याच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ घातली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकूण 57 आमदार विजयी झाले आहेत. 

हे ही वाचा >> INSIDE STORY: मुंबईत महिला पायलटचा संशयास्पद मृत्यू? प्रियकराने दुसऱ्या गर्लफ्रेंडला फ्लॅटवर बोलावलं अन्...

बुधवारी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ हा पद मला मोठा वाटतो. अडीच वर्षांच्या कार्यकाळात हे पद मला जनतेनं दिलं आहे. मी स्वत: काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांना फोन करून सांगितलं की, सरकार बनवताना निर्णय घेताना... कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा इतर कुणामुळे हे अजिबात मनात आणू नका.

हे ही वाचा >> Nana Patole :"जनतेची मतं चोरण्याचा आणि डाका टाकण्याचं काम...", नाना पटोलेंनी सांगितली A to Z स्टोरी

महाराष्ट्राच्या जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो. हा खूप मोठा विजय आहे. ही लँड स्लाईड विक्ट्री आहे. गेल्या अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं आहे, त्यावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. थांबवलेली कामं मविआने पुढे नेली. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. हा जनतेचा विजय आहे, असंही शिंदे म्हणाले होते. तर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज्यात महायुतीची एकजूट आहे. एकदा मुख्यमंत्री जाहीर झाला की ती व्यक्ती राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेईल. महायुतीचे घटक पक्ष एकत्र आहेत. आम्ही वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन सर्व निर्णय घेणार आहोत.

    follow whatsapp