Ravindra Waikar : 'दूध का दूध, पाणी का पाणी होईल...' वायकर स्पष्टच बोलले

मुंबई तक

• 09:38 PM • 16 Jun 2024

Ravindra Waikar News : हजारो पोलिस, 20 उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी तेथे उपस्थित होते. एकटा रवींद्र वायकर तिथे जाऊन काय करणार होता. मात्र, आता रडीचा डाव चाललेला आहे. ही पराजय त्यांच्या जिव्हारी लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 ravindra waikar reaction on north west mumbai lok sabha election result 2024 waiker kin using mobile phone that unlock evm machine

हा सगळा रडीचा डाव सुरू आहे.

follow google news

Ravindra Waikar News : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waiker)  यांच्या नातेवाईकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआरआय नोंदवला होता. या घटनेनंतर रविंद्र वायकर यांनी पराभव जिव्हारी लागलाय म्हणून हा रडीचा डाव सूरू असल्याची टीकी ठाकरे गटावर केली.  (ravindra waiker reaction on north west mumbai lok sabha election result 2024 waiker kin using mobile phone that unlock ev machine) 

हे वाचलं का?

रवींद्र वायकर पत्रकारांना प्रतिक्रिया देत होते. यावेळी वायकर म्हणाले, मतमोजणी केंद्रात किती मोबाईल होते? त्यासाठी कायद्यात काही असेल तर ते त्यांनी कायद्याने ते करावे. पारदर्शकपणे निवडणूक झाली नसेल तर कायद्याने काय असेल, ते करावे. मी मतमोजणी केंद्रावर सहा वाजता गेलो होतो. मग मतमोजणी पूर्ण झाली नसताना विजयी घोषित का केले गेले? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. मतमोजणी पूर्ण झालेली नसताना विजयी घोषित करण्यात आल्याने मी तेथे गेलो होतो. मात्र, आता विरोधक हा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप वायकर यांनी केला आहे.

हे ही वाचा : "...तर मी राजकारणच सोडेन", पंकजा मुंडेंच्या अश्रूंचा फुटला बांध

या संदर्भात खासदार रवींद्र वायकर म्हणाले की, हा सगळा रडीचा डाव सुरू आहे. बाकी काही चाललेले नाही. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. हिंदुस्थानमध्ये इलेक्शन झाल्यानंतर सगळ्या ठिकाणचा निकाल लागला, तसाच माझा देखील निकाल लागला. मी सहा वाजेपर्यंत इथेच होतो. त्यानंतर मी मतमोजणी केंद्रावर गेलो. सहा वाजता मी गेलो तेव्हा मला कळले की, त्या आधीच एका उमेदवाराला घोषित करून टाकले. एक लाख मतमोजणीची बाकी असताना त्या आधीच तुम्ही निकाल कसा घोषित केलात? त्यामुळे मी तिथे गेलो, असे देखील रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे. हजारो पोलिस, 20 उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी तेथे उपस्थित होते. एकटा रवींद्र वायकर तिथे जाऊन काय करणार होता. मात्र, आता रडीचा डाव चाललेला आहे. ही पराजय त्यांच्या जिव्हारी लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.

    follow whatsapp