Sharad Pawar : परळीतून शरद पवारांची मोठी खेळी, धनंजय मुंडेंविरोधात मराठा कार्ड; कोण आहे उमेदवार?

मुंबई तक

• 04:21 PM • 27 Oct 2024

Sharad Pawar NCP Candidate Third List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवारांनी परळी मतदार संघातून अजित पवारांचे उमेदवार धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे फॅक्टर असलेल्या बीड जिल्ह्यात पवारांनी मराठा कार्ड खेळत मोठी खेळी केली आहे.

 sharad pawar ncp declare there third list parli assembly election 2024 dhananjay munde vs rajesaheb deshmukh maharashtra politics

परळीतून शरद पवारांची मोठी खेळी

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

point

धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार दिला

point

कोण आहे उमेदवार?

Sharad Pawar NCP Candidate Third List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवारांनी परळी मतदार संघातून अजित पवारांचे उमेदवार धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे फॅक्टर असलेल्या बीड जिल्ह्यात पवारांनी मराठा कार्ड खेळत मोठी खेळी केली आहे. त्यामुळे आता परळी मतदार संघात तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. (sharad pawar ncp declare there third list parli assembly election 2024 dhananjay munde vs rajesaheb deshmukh maharashtra politics) 

हे वाचलं का?

बीडच्या परळी विधानसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने धनंजय मुडेंना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शरद पवार मुंडेंविरोधात कोणता उमेदवार उभा करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शरद पवारांनी या मतदार संघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदार संघात मराठा विरूद्ध संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar Candidate List : अजित पवार यांची दुसरी यादी एका क्लिकवर वाचा, किती उमेदवार आयात केलेत?

कोण आहेत राजेसाहेब देशमुख? 

राजेसाहेब देशमुख हे काँग्रसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला. या प्रवेशानंतर आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांनी बीड जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती पद सांभाळलं आहे. 

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 3rd Candidates List) 

ज्ञायक पाटणी - कारंजा 
अतुल वांदिले - हिंगणघाट
रमेश बंग - हिंगणा 
फहाद अहमद - अनुशक्तीनगर 
राहुल कलाटे - चिंचवड 
अजित गव्हाणे - भोसरी
 मोहन जगताप  - बीड माजलगाव
 राजेसाहेब देशमुख - परळी
सिद्धी कदम - मोहोळ   

    follow whatsapp