मुंबई: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपले बंधू आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. (uddhav thackeray criticized raj thackeray for his unconditional support to bjp and narendra modi)
ADVERTISEMENT
'बिनशर्ट पाठिंबा...', उद्धव ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले...
'एक गोष्टी बरी झाली या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण.. मित्र कोण आणि शत्रू कोण.. हे स्पष्ट झालेलं आहे.. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना 'बिनशर्ट' पाठिंबा दिला..'
'बिनशर्ट... अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट.. बरोबर का चूक?'
हे ही वाचा>> 'तुमच्या वडिलांचा फोटो लावा आणि...', ठाकरेंचं CM शिंदेंना आव्हान
'काय.. उद्धव ठाकरे नको.. मी हा बघा शर्ट काढला.. बिनशर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड.. काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून, ढोंग करून पाठिंबा दिला.. लढण्याचं नाटक करून केलं..' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्याची जोरदार खिल्ली उडवली.
राज ठाकरेंनी जाहीर केलेला बिनशर्त पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात जाहीर केलं होतं की, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत यासाठी आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहोत. त्यांच्या या घोषणेनंतर अनेक विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली होती.
कारण 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना राजकीय क्षितीजावरून हटवा असं आवाहन मतदारांना केलं होतं. त्यामुळे जेव्हा त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला तेव्हा त्यांच्या या टीकेची आठवण करून देत अनेकांनी टीकेची झोड उठवली.
हे ही वाचा>> Sanjay Raut : राऊतांचा PM मोदींना टोला, ''मोदी हा ब्रँड होता, आता...''
दरम्यान, या यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही जाहीर सभा देखील होत्या. मुंबईतील देखील पंतप्रधान मोदींच्या सभेत त्यांनी भाषण केलं होतं.
मात्र, असं असलं तरी महाराष्ट्रातील मतदारांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपशेल नाकारलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT