Solapur Malshiras News : बीड, जालना, परभणी, लातूर, पुण्यात घडलेल्या गुन्हेगारीच्या काही घटनांमुळे महाराष्ट्र अक्षरश: हादरला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे दृष्य पाहून महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती. या घटनांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात गुन्हेगारांचा हैदोस थांबेल, पोलीस गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळतील असं वाटत होतं. मात्र, त्यानंतरही अशा घटना सातत्यानं सुरूच आहेत. आता सोलापूरमधील माळसिरसमध्येही एका तरूणाची अशीच क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अर्धनग्न करत चटके दिले, हत्या केली...
हे ही वाचा >> Satish Bhosale : प्रयागराजमध्ये लपलेला खोक्या कसा सापडला? 'या' चार गुन्ह्यांमुळे सतीश भोसलेचा पाय खोलात
माळशिरस तालुक्यात एका तरुणाला नग्न करून त्याच्या शरीरावर लोखंडी सळईने चटके देत त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. या घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरलाय. माळशिरस तालुक्यातील पिलीव गावात राहणाऱ्या 28 वर्षांच्या आकाश खुर्द-पाटील या तरुणाचा माळशिरस-पिलीव रोड वर पिलीव हद्दीत असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये निर्वस्त्र मृत्यूदेह आढळून आला. यावेळी त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा दिसल्या, यात त्याला गरम लोखंडी सळईने चटके दिले असल्यासारख्या जखमा दिसून आल्या. तसंच तोंडातून रक्त आलेलं दिसलं. रस्त्यावर ज्या ठिकाणी त्याच्या मृतदेहाशेजारी त्याची मोटरसायकल आढळून आली होती. या घटनेनं पिलीव सह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.
प्रेम प्रकरणातून घडलं प्रकरण?
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पिलीव औट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी लगेचंच घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेचा पंचनामा केला. हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय असून या प्रकरणी एक तरुणी आणि एका अल्पवयीन मुलाला माळशिरस पोलिसांनी ताब्यात घेतलंय, अशीही माहिती समोर येतेय.
हे ही वाचा >> Crime : एक महिन्याच्या बाळाचं अपहरण, हजारो रिक्षा चालकांची चौकशी करत पोलिसांनी बाळ विकण्यापूर्वीच...
राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, किरकोळ कारणातून होणारी बेदम मारहाण, लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा आकडा प्रचंड वाढताना दिसतोय. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
