Kalonji Benefits To Reduce Uric Acid : ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्यूरीन असतं, त्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढते. युरिक अॅसिडच्या समस्येमुळे महिला आणि पुरुषांची चिंता वाढते. युरिक अॅसिड वाढल्याने किडनी, शरारीतील सांधेदुखी, अर्थरायटिससारख्या आरोग्याच्या समस्यांना सामोर जावं लागतं. युरिक अॅसिड एक अशी समस्या आहे, ज्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. युरिक अॅसिड प्रत्येकाच्या शरीरात निर्माण होतं, ही एक सामान्य गोष्ट आहे. किडनीच्या माध्यमातून युरिक अॅसिड फिल्टर होतं. परंतु, जेव्हा हे युरिक अॅसिड बाहेर फेकलं जात नाही, त्यावेळी शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढते आणि सांधेदुखीची समस्या निर्माण होते.
ADVERTISEMENT
युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपायही फायदेशीर ठरतात. नोएडा येथील आरोग्य सेंटरचे आयुर्वेदिक डॉक्टर एस के पांडे यांनी म्हटलंय की, युरिक अॅसिडला नियंत्रणात आणण्यासाठी कलौंजीचं पाणी खूपच फायदेशीर असतं. हे शरीरात साचलेलं युरिक अॅसिडला बाहेर काढतं. तसच सांध्यांची सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.
डॉ. एस के पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलौंजीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सीडंट्स आणि फायबरसारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे युरिक अॅसिडची पातळी कमी होते. कलौंजीचं नियमितपणे सेवन केल्याने युरिक अॅसिडच नाही, तर अन्य समस्याही दूर होतात.
हे ही वाचा >> Pune : अरिजित सिंगच्या कॉन्सर्सटसाठी पुण्यात वाहतुकीत बदल, कोणते रस्ते बंद, कुणाचा ताप वाढणार?
कलौंजी युरिक अॅसिडसाठी खूपच फायदेशीर
कलौंजी एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. कलौंजीच्या सेवनामुळे शरीरातील टॉक्सिन्स आणि युरिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते. यामध्ये थायमो क्वीनोन नावाचं घटक असतं. यामुळे सांध्यांवर असलेली सूज आणि वेदना कमी होते. याचसोबत कलौंजीचं पाणी प्यायल्याने किडनी मजबूत होण्यास मदत मिळते. तसच किडनीला डिटॉक्सही करतं.
युरिक अॅसिडची समस्या असल्यास काय कराल?
1 चमचा कलौंजीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी या बीयांचा किस मोकट पाण्यात मिक्स करा आणि ते पाणी प्या. यामुळे शरीरातील युरिक अॅसिड वेगाने फ्लश आऊट होण्यास मदत होते. याशिवाय अर्था चमच कलौंजी पावडरमध्ये 1 चमच मध मिसळा. हे पाणी रोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी खाऊ शकता.
हे ही वाचा >> Tejpratap Yadav यांच्या आदेशावर डान्स करणाऱ्या पोलिसावर कारवाई, 'त्या' स्कूटरचंही चलन फाडलं
पचनक्रियेसाठी लाभदायक
कलौंजीचं सेवन केल्यावर पचनक्रिया सुधारते. रोज सकाळी रिकाम्या पोटी कलौंजीच्या पाण्याचं सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. तसच कब्जच्या समस्येवरही हे रामबाण उपाय ठरतं. कलौंजीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. ज्या लोकांना कब्ज आणि गॅसची समस्या आहे, त्यांच्यासाठी कलौंजी खूपच फायदेशीर असते.
ADVERTISEMENT
