Weather In Maharashtra : मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेच्या लाटा! 'या' ठिकाणी कसं आहे तापमान? वाचा सविस्तर

Mumbai Weather Today: सध्या उत्तरेकडून अद्यापही थंड वारे येत असले तरी महाराष्ट्रात मात्र आता उन्हाळी वातावरण सुरू झालं आहे. कारण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमान वाढत आहे.

Mumbai Weather Update Today

Mumbai Weather Update Today

मुंबई तक

06 Mar 2025 (अपडेटेड: 06 Mar 2025, 11:37 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत आणि उपनगरात कसं असेल आजचं तापमान?

point

मुंबईसह या ठिकाणी कसं राहील हवामान?

point

आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Update: सध्या उत्तरेकडून अद्यापही थंड वारे येत असले तरी महाराष्ट्रात मात्र आता उन्हाळी वातावरण सुरू झालं आहे. कारण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमान वाढत आहे. उत्तर आणि ईशान्येकडील काही राज्यात पावसाच्या सरी या बरसत आहे. पण दक्षिण भारतात मात्र तापमानात वाढ होत असल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. 

हे वाचलं का?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36°C आणि 19°C च्या आसपास असेल.दरम्यान, उद्या 6 मार्च 2025 ला राजधानी दिल्लीत किमान तापमान 13°C  आणि कमाल तापमान 29°C  असणार आहे.

तर मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36°C आणि 19°C च्या आसपास असेल. कोलकातामध्ये किमान तापमान 18°C  आणि कमाल तापमान 31°C  असेल. अहमदाबादमध्ये दिल्लीत किमान तापमान 18°C  आणि कमाल तापमान 34°C असणार आहे. बंगळुरुत किमान तापमान 20°C  आणि कमाल तापमान 33°C  असणार आहे.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "गद्दारांनो 'छावा' बघा..", उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर डागली तोफ, अबू आझमी, नीलम गोऱ्हेंनाही सुनावलं

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामान बदलाचे वार फिरताना दिसत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, सिक्कीम आणि मेघालयामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. दिल्लीचे तापमान 2.4 अंश सेल्सियने कमी झाल्याने वायव्य भारतात कमाल तापमानात 2 अंश सेल्सियने वाढ होण्याची शक्तता हवामान विभागाने वर्तवली होती. हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

हे ही वाचा >> अबू आझमींचं निलंबन नेमकं झालं कशामुळे? तुम्हाला माहितीए त्याची नेमकी Story?


 

    follow whatsapp