ADVERTISEMENT
देशातील सर्वात मोठी सीलबंद पाणी विकणारी कंपनी बिसलेरी काही दिवसांपासून बातम्यांमध्ये आहे.
आधी टाटा समूहाच्या टाटा कन्झ्यूमरसोबत व्यहार झाला आणि नंतर करार रद्द झाल्याची चर्चा झाली.
7000 कोटींच्या या कंपनीच्या उत्तराधिकाऱ्यावरून दररोज नवीन माहिती समोर येत आहे.
टाटासोबतची डील फिस्कटल्यानंतर रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान कंपनी सांभाळेल.
मंगळवारी (21 मार्च) रमेश चौहान आणि जयंती यांच्यातील वाद पुन्हा समोर आले.
रमेश चौहान यांना कंपनी मुलीकडे सोपवायची होती, पण त्यांनी निर्णय बदलला.
त्यांनी अंजेलो जॉर्ज यांच्याकडे बिसलेरीची सूत्रं दिली, ते बिसलेरी इंटरनॅशनलचे सीईओ आहे.
30 वर्षांचा कामाचा अनुभव असलेले अँजेलो जॉर्ज यांनी 2019 मध्ये बिसलेरीमध्ये काम सुरू केलं.
अंजेलो यांनी ख्रिश्चिच कॉलेजमधून पदवी आणि बंगळुरू विद्यापीठातून पीजीडीएम पूर्ण केलं.
शिकागोतील Kellogg School of Management मधून अॅडव्हॉस ग्लोबल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला.
बिसलेरी आधी ते हिंदुस्थान युनिलिव्हर, ईमामी लिमिटेडसह अनेक कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर होते.
भारतातील 20 हजार कोटींच्या सीलबंद पाणी बाजार पेठेत बिसलेरीचा हिस्सा 31 टक्के आहे.
ADVERTISEMENT