Aaditya Thackeray Sandeep Deshpande : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसे संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, "मला वाटलं बायडेन येत आहेत." आदित्य ठाकरेंच्या याच विधानावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला. (Sandeep Deshpande criticized Aditya Thackeray.)
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरेंचे उल्लेख न करता त्यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला.
आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे
संदीप देशपांडे म्हणाले, "मराठीत नाटक आलं होतं, झोपी गेलेला जागा झाला. साडेचार वर्षात त्यांना कधी वाटलं नाही की, महापालिकेसोबत बैठक घ्यावी; पण आज का त्यांना वाटलं? स्वतःचा नातेवाईक बिल्डर मित्र आहे, त्याला तुम्हाला तिकडे बसवायचा आहे म्हणून तुम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली", असा दावा संदीप देशपांडे यांनी केला.
हेही वाचा >> "तुम्ही न्यायालयाला सांगू नका", सरन्यायाधीश चंद्रचूड ठाकरेंच्या वकिलावर भडकले
"गेल्या साडेचार वर्षात तुम्ही विधानसभेमध्ये पूर्वीच्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा केली, रेकॉर्ड काढून बघा? तुम्हाला भाषणाची संधी मिळाली तेव्हा वरळीच्या संदर्भात किती प्रश्न विचारले? आज अचानक तुम्हाला जाग आलेली आहे, कारण तुमची झोप उडालेली आहे. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे", असे प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना दिले.
बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता आदित्य ठाकरेंना टोला
"तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात का तुमच्या समोर जो बायडन यायला? मध्ये पण मेस्सी आणि रोनाल्डो असं देखील म्हटले होते. रोनाल्डो आणि मेस्सी स्वतःचा खेळ सुधारून फुटबॉलपटू झाले आहेत. त्यांचे आजोबा फुटबॉलपट होते म्हणून ते नाही झाले", असा टोला संदीप देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव न घेता आदित्य ठाकरेंना लगावला.
हेही वाचा >> राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल, शिंदेंसोबतच्या भेटीवरून घेरलं
"आदित्य ठाकरे यांचं खोटं बोल, पण रेटून बोला असं सुरू आहे. कोरोना काळात तुम्ही कुठे होता, हे तुम्ही पहिले सांगा? रेल्वेमध्ये लोकांना बसू दिले जात नव्हते, तेव्हा मनसेने आंदोलन केले. त्या काळामध्ये तुम्ही कुठे होतात याचे उत्तर तुम्ही आम्हाला द्या?", असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची भूमिका
"कालचे जे धाराशिवमध्ये आंदोलन होते त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंदोलन कशाने प्रेरित होतं, हे सगळ्यांना कळतंय. राज ठाकरेंनी अगोदरच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जी भूमिका बाळासाहेबांनी मांडली होती, तीच भूमिका राज ठाकरेंनी अगोदर मांडलेली आहे", असे संदीप देशपांडे यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलताना सांगितले.
ADVERTISEMENT