Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी मोदींच्या आता महाराष्ट्राच्या वाऱ्या वाढल्या आहेत, कारण आता निवडणुका जवळ येत आहे. त्यामुळे ते मणिपूरला जाणार नाहीत मात्र ते महाराष्ट्रात येणार. कारण लोकसभेच्या (Loksabha) मणिपूरमध्ये फक्त दोन जागा आहेत, तर महाराष्ट्रात मात्र 48 जागा असल्यामुळे त्यांचे महाराष्ट्रात दौरे केले जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. कारण बीजेपी म्हणजे भाकड जनता पार्टी म्हणत त्यांनी भाजपवर आणि केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचं योगदान काय?
ज्यावेळी बाबरी पाडली गेली त्यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली तरीही आजही भाजपमधील शेंबडी पोरं आज विचारत की राम मंदिरामध्ये शिवसेनेचं योगदान काय? मात्र बाबरी का अशीच पडली काय असा सवालही त्यांनी यावेळी केला. ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी प्रश्न विचारणाऱ्यांचा जन्मही झाला नसेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
‘सनातन’चे कैवारी
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर टीका करताना राणेंचं नाव न घेता बाजारबुणगे म्हणत भाजपमध्ये गेलेले काही बाजारबुणगे, भ्रष्टाचारी नेते शंकराचार्यांच्याच अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतात. तर त्याचवेळी ते हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय असा सवाल करतात. त्यावेळी सनातन धर्माचे कैवारी समजले जाणारे कुठं जातात, त्यांना हा सवाल चालतो का? असा सवाल करून सनातन धर्मावरून त्यांनी भाजपला घेरले आहे.
हे ही वाचा >> Ram Mandir: ‘या’ उद्योगपतीकडून राम मंदिराला 101 किलो सोनं दान, अब्जाधीश अंबानींनी काय दिलं?
हिंदूंच्या रक्षणासाठी…
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून शिवसेनेचे योगदान काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन देत राम मंदिरासाठीच आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर हिंदुंच्या रक्षणासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला असल्याची आठवणही त्यांनी भाजपला करून दिली.
शेतकऱ्यांची छाती भारी पडणार
भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय संस्थांना तुम्ही तुमच्या तालावर नाचवत आहात. मात्र शिवसेनेत कोणीही भेकड नाही. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना शिकवण दिली आहे की, शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा असं सांगत ज्यांना शिवसेनेतून भेकड शेळी सारखे जायचे आहे त्यांनी आता खुशाल जावे असा टोलाही पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला आहे.
गुजरात के लिए धन की बात
नाशिक दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी टीका करताना नरेंद्र मोदी देश के लिए मन की बात करतात, मात्र गुजरात के लिए धन की बात करतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ज्यावेळी महाराष्ट्र संकटात होता, शेतकरी हवालदिल होता, त्यावेळी मोदींनी महाराष्ट्राची आठवण होत नाही मात्र गुजरात गरज नसतानाही त्यांन हजारो कोटींची मदत जाहीर करतात अशी टीका करत त्यांनी मोदींच्या गुजरात दोऱ्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले.
ADVERTISEMENT