Eknath Shinde : शिंदेंच्या खासदाराच्या अडचणी वाढणार? हायकोर्टात याचिका; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

• 07:50 PM • 08 Aug 2024

Eknath shinde News : मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर आक्षेप घेणारी याचिका पराभूत अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट राजू पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.

eknath shinde shiv sena mp shrirang barne lok sabha result petition filed in high court maharashtra politics

राजू पाटील यांनी हा आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंच्या खासदाराविरोधात हायकोर्टात याचिका

point

खासदारकीवर आक्षेप घेणारी याचिका दाखल

point

शिंदेंच्या खासदाराच्या अडचणी वाढणार

Petition filed against Shrirang Barne : पिंपरी- चिंचवड, कृष्णा पांचाळ :  लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला होता. त्यामधील एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) शिवसेनेला केवळ 7 जागा जिंकता आल्या होत्या. या 7 जागांमधील अनेक निकालांवर ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. आता असाच आक्षेप शिंदेंचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्याविरोधात घेण्यात आला आहे. पराभूत अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट राजू पाटील यांनी हा आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. (eknath shinde shiv sena mp shrirang barne lok sabha result petition filed in high court maharashtra politics) 

हे वाचलं का?

मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर आक्षेप घेणारी याचिका पराभूत अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट राजू पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. 573 मतांची तफावत आणि बारणे यांनी प्रचारावेळी केलेला गैरप्रकार या सगळ्या प्रकरणी राजू पाटील  यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्या अडचणी  वाढवण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती अर्ज...सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?

निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाले आहेत. तसेच 573 मतांची तफावत येणे हे चुकीचे. इतकी तफावर येऊच शकत नाही हा माझा पहिला आक्षेप असल्याचे राजू पाटील यांनी म्हटलं आहे. मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा असताना देखीव अनेक लोक गुलाल लावून केंद्रावर जवळ आले होते. याबद्दल तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही.

प्रचाराच्या दरम्यान त्यांनी अनेक गैरप्रकार केले आहेत. याबाबत मी पोलीस ठाण्यात आणि निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दिली होती. मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मी याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता कोर्ट मला न्याय देईल अशी माझी अपेक्षा आहे, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.  

हे ही वाचा : Nag Panchami 2024: नागपंचमीचा शुभ मुहूर्त कधी, केव्हा करावी नागाची पूजा?, विधी आणि उपाय

दरम्यान याआधी राजू पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारादरम्यान धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात पुरावे आपण न्यायालयातील याचिकेत दिले असल्याचे म्हटले आहे. खासदार बारणे धार्मिक ध्रुवीकरण करुन जिंकून आले आहे. त्यासंदर्भात आपण आक्षेप घेतला आहे. त्यांनी धर्माच्या नावावर मते मागितली होती. त्याची तक्रार प्रशासन आणि पोलिसांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. १९८८ मध्ये असा प्रकार झाला होता. त्यावेळी त्या आमदाराची आमदारकी रद्द करण्यात आली होती. ही सर्व उदाहरण याचिकेत दिले आहेत. या याचिकेत अनेक गंभीर मुद्दे न्यायालयासमोर आणले आहे. त्यामुळे आपणास न्याय मिळेल, असा दावा राजू पाटील यांनी केला आहे.

    follow whatsapp