Chhatrapati: ‘कात्रजचा घाट’ अन् छत्रपती शिवाजी महाराजांचं कनेक्शन; काय आहे इतिहास?

मुंबई तक

05 May 2023 (अपडेटेड: 06 May 2023, 06:43 AM)

कात्रजचा घाट दाखवणे ही म्हण राजकीय वर्तुळात नेहमीच वापरली जाते. पण कात्रजचा घाट दाखवणे ही म्हण नेमकी आहे काय? या म्हणीचा अर्थ काय? आणि ऐतिहासिक संदर्भ काय? हे जाणून घेऊयात.

Chhatrapati Shivaji Maharaj katrajacha ghat meaning and what was the history

Chhatrapati Shivaji Maharaj katrajacha ghat meaning and what was the history

follow google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातले चाणक्य आहेत.याची प्रचिती तुम्हाला त्यांच्या अनेक राजकीय डावपेच रचताना आली असेलच. तसेच कात्रजचा घाट दाखवण्यात माहिर असणारे राजकीय नेते म्हणून देखील शरद पवार यांचा राजकारणात उल्लेख होतो. विशेष म्हणजे कात्रजचा घाट दाखवणे ही म्हण राजकीय वर्तुळात नेहमीच वापरली जाते. पण कात्रजचा घाट दाखवणे ही म्हण नेमकी आहे काय? या म्हणीचा अर्थ काय? आणि ऐतिहासिक संदर्भ काय? हे जाणून घेऊयात. (katrajacha ghat meaning and what was the history behind shivaji maharaj)

हे वाचलं का?

कशी उत्पत्ती झाली म्हणीची..

कात्रजचा घाट दाखवण्यात माहिर असणारे राजकीय नेते म्हणून देखील शरद पवार उल्लेख होतो. पण या म्हणीला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. खरं तर शाहिस्तेखानाला अद्दल घडविण्यासाठी शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला. त्यावेळी घडलेल्या घटनेतूनच कात्रजचा घाट दाखवणे या म्हणीची उत्पत्ती झाल्याचे बोलले जाते.

म्हणीचा इतिहास काय?

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचा मामा म्हणजे शाहिस्तेखान सारखा मोठा सरदार होता. बंगालचा सुभेदार असलेल्या शाहिस्तेखानाला समोरासमोर हरवण तितकसं सोप्प नव्हतं. कारण प्रचंड सैनिक हाताशी असलेला शाहिस्तेखानला सहज हरवता येणार होते. त्यामुळे क्लुप्ता लढवून शाहिस्तेखानाला हरवता येईल, याची कल्पना शिवाजी महाराजांना होती.

शाहिस्तेखान छत्रपती शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी आला होता. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकून आपल्या लवाजम्यासहित पुण्यात मुक्काम ठोकला होता. पुण्यात तळ ठोकलेला शाहिस्तेखान काही केल्या हलायला तयार नव्हता. दुसरीकडे छत्रपती शिवाज महाराज तेव्हा सिंहगडावर मुक्कामी होते.लालमहालात राहणाऱ्या शाहिस्तेखानला समोर जाऊन हरवण अशक्य होतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शक्कल लढवली. आणि ही योजना शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा भाग होती.

लालमहालात राहणाऱ्या शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी लग्नाचा आसरा घेतला होता. शिवाजी महाराजांसह मोजकेच मावळे देखील होते. तर लाल महालाची सर्व माहिती असलेले शिवाजी महाराज महालात घुसले होते. त्यानंतर महालात एकच धावपळ सुरू झाली होती. शाहिस्तेखानही पळून जाण्याच्या तयारीत होता. याचवेळी शिवाजी महाराजांनी संधी साधली आणि वार केला. यामघ्ये शाहिस्तेखानाची बोट तुटली. आणि ही माहिती शाहिस्तेखानाच्या फौजेलाही मिळाली.

दरम्यान शाहिस्तेखानाच्या इतक्या मोठ्या फौजेचा सामना करण शक्य नव्हतं. महाराजांनी मावळ्यासाहित सिंहगडचा रस्ता धरला. शाहिस्तेखानाच सैन्य शिवाजी महाराजांच पाठलाग करत होतं. या सैन्याला चकवा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी क्लुप्ती लढवली. शिवाज महाराजांनी बैलाच्या शिंगाला पेटत्या मशाली बांधल्या आणि बैल कात्रज घाटाच्या दिशेने सोडून दिले. शाहिस्तेखानाच सैन्य कात्रजच्या दिशेने गेले आणि महाराज सुखरूप सिंह गडावर पोहोचले.शिवाजी महाराजांच्या या गणिमी काव्यामुळे कात्रजचा घाट दाखवण्याची म्हण रूढ झाली होती.

    follow whatsapp