Chhagan Bhujbal: मंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना आपण 16 नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यावर आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘राजीनामा (resignation) द्यायचा झाला तर त्यांनी राज्यपालांकडे (Governor) द्यावा, आम्हालादेखील समजत. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर ते तो नाकारू शकतात, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नये’ असा जोरदार टोला लगावला होता.
ADVERTISEMENT
निर्णय कोण घेतं ?
जितेंद्र आव्हाडांच्या त्या टीकेलाही भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे, यावेळी त्यांनी ‘मंत्रिमंडळाचे सगळे निर्णय घेतं कोण असा सवाल करत माझा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत काम तर करावंच लागणार’ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरून आणि त्या पदाच्या लाभावरूनही त्यांनी त्यांना लक्ष्य केले होते. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हे ही वाचा >> भाऊच भावाच्या जीवावर उठला, 9 वर्षाच्या भावाला डोकं फोडून का संपवलं?
काय लाभ घेतो?
‘सरकारी लाभ, लाभ म्हटले जाते मात्र मी असा काय लाभ घेतो आहे. कारण मी सभेसाठी मी माझ्या गाडीतून फिरतो आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्या गाडीतून सभेला जातो आणि सभा घेत’ असल्याचेही त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना सांगितले.
मुख्यमंत्री कळवतात
यावेळी त्यांनी थेट आव्हाडांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, राजीनामा राज्यपालांकडेच द्यावा लागतो. मात्र मंत्री कोण करतं?, मंत्र्यांना नाव कोण कळवतं तर मुख्यमंत्र्यांकडूनच ती नावं कळवली जातात. कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं आहे हे मुख्यंत्रीच ठरवून कळवत असतात. त्याच बरोबर मंत्रिमंडळाचं काम सगळं मुख्यमंत्री ठरवतात, कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचं हे मुख्यमंत्रीच ठरवतात त्या प्रमाणे मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतात असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
छगन भुजबळांनी आपल्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरून हा वाद आणखीन रंगणार असल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT