Amit Deshmukh : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच धाराशिवमध्ये मात्र आमदार अमित देशमुख आणि ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यामुळे वेगळीच चर्चा रंगली. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आलेले असतानाच अमित देशमुख यांनी राजकीय फटकेबाजी करत, मीही धाराशिवमधून (Dharashiva) उमेदवारी मागू शकतो, कारण माझा जन्मच धाराशिवचा असल्याचे सांगितल्यानंतर जोरदार हशा पिकला. त्यांच्या या वक्तव्यामुळे धाराशिवच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगल्या.
ADVERTISEMENT
‘मीही धाराशिवमधून उमेदवार’
आमदार अमित देशमुख औसा येथे बोलताना सांगितले की, ‘माझा जन्मच धाराशिव जिल्ह्यातील आहे. त्यामुळे मी ही धाराशिवमधून उमेदवारी मागू शकतो मात्र या लोकसभेला धाराशिव येथे ओमराजे निंबाळकरच खासदार म्हणून निवडून येणार असल्याचेही शक्यता सांगतिले. लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे आता आणखी जोरदार चर्चा होऊ लागली.
हे ही वाचा >> भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं, राजीनाम्यावर स्पष्टच बोलले; मुख्यमंत्रीच…’
ओमराजेंना शुभेच्छा
लातूर जिल्ह्यातील औसा येथे लातूरचे आमदार अमित देशमुख व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर एका पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. त्यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या.
उमेदवारीच केली जाहीर
या शुभेच्छा देताना त्यांनी माझा जन्म दाखला हा लातुरचाच असल्याचे सांगत माझी राजकीय उमेदवारी येथूनही जाहीर करू शकतो असं बोलताच नागरिकांमधूनही जोरदार हशा पिकला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारीही त्यांनी नकळत जाहिरच करुन टाकली असल्याचे चर्चा रंगू लागली आहे.
वेगळा विचार नाही
अमित देशमुख यांनी यावेळी लातूरचा जन्मच हा उस्मानाबाद जिल्ह्यातूनच झाला आहे. आणि माझ्या बर्थ सर्टिफिकेटवरसुद्धा तालुका लातूर व जिल्हा उस्मानाबाद असंच लिहिलेलं असल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळेच हे बर्थ सर्टिफिकेट दाखऊन मीसुद्धा उस्मानाबादमध्ये उमेदवारी मागू शकतो असं मात्र असा कोणताही वेगळा विचार आमच्या डोक्यामध्ये आम्ही आणण्याचं काही कारण नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
निवडून तर ‘तेच’ येणार
यावेळी आमदार अमित देशमुख यांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणी कुठेही निवडून येईल मात्र धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये मात्र फक्त ओमराजे निंबाळकर हेच निवडून येणार असल्याचा विश्वासही आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT