Mumbai Tak Chavdi : "राज साहेबांचा मुलगा म्हणून मतदान करू नका, तर...", अमित ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन

मुंबई तक

27 Oct 2024 (अपडेटेड: 28 Oct 2024, 03:02 PM)

Amit Thackeray Mumbai Tak Chavdi Interview : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकला चलो रे चा नारा दिल्यापासून कंबर कसली आहे.

Amit Thackeray Chavdi Interview

Amit Thackeray Chavdi Interview

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघच का निवडला?

point

मुंबई तकच्या चावडीत अमित ठाकरेंनी सांगितली A To Z स्टोरी

point

राज ठाकरेंबाबत अमित ठाकरेंचं मोठं विधान

Amit Thackeray Mumbai Tak Chavdi Interview : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकला चलो रे चा नारा दिल्यापासून कंबर कसली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अमित ठाकरेंनी माहिम विधानसभा मतदारसंघात रणशिंग फुंकलं आहे. अमित यांच्यासमोर  शिंदे गटाचे सदा सरवणकर तर ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं तगडं आव्हान असणार आहे. अशातच अमित ठाकरे यांनी मुंबई तकच्या चावडीवर मोठं विधान केलं आहे. 

हे वाचलं का?

मुंबई तकच्या चावडीत अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अमित ठाकरेंना महायुतीचं समर्थन मिळालं पाहिजे, असं विधान आशिष शेलारांनी केलं होतं, यावर अमित ठाकरे म्हणाले, आशिष शेलार सर किंवा राणे साहेब असतील, ते मल मुलासारखे बघतात. आमचं नातं वेगळं आहे म्हणून ते बोलले होते. त्यांना माझ्यावर विश्वास आहे. त्यांचं आभार मानतो की ते एव्हढे उघडपणे माझ्याबद्दल बोलले. सदा सरवणकर माघार घेणार नसतील, तरी ठीक आहे. कोण समोर असेल किंवा नसेल, मी या निवडणुकीत शंभर टक्के देणार आहे आणि प्रामाणिक प्रयत्न करेन.  तुम्ही मतदानाला उतरताय तर तुम्ही कोणाला मदतान करताय? तो तुमच्यासाठी काय करू शकतो? हे लोकांना कळलं पाहिजे. राज साहेबांचा मुलगा म्हणून मला मतदान नका करू. माणूस काय आहे, समजून घ्या. समोर उमेदवार असेल किंवा नसेल, हे मी निवडणुकीत पाहत नाही. मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करणार.

हे ही वाचा >>  'मी म्हटलं, मी संपलो...', राज ठाकरेंनी सांगितला कॉलेजमधील 'त्या' मुलीचा भन्नाट किस्सा!

विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघच का निवडला?

"मी हा मतदारसंघ नाही निवडला. मतदारसंघ कोणता आहे, हे मला लिस्ट येईपर्यंत माहित नव्हतं. लिस्टमध्ये माझं नाव येणार आहे, हे मला शेवटपर्यंत माहित नव्हतं. लिस्टमध्ये नाव आल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. मला साहेबांनी तिनदा विचारलं की तुझी तायरी आहे का? तुला लढायचं आहे का? आमदाराचे असे असे विषय असतात. तुझं आयुष्य बदलणार आहे. मी त्यांना म्हणालो माझी तयारी आहे. मला त्यांच्यावर वडील म्हणून कुठेतरी दबाव दिसत होता. माझ्यामार्फत इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये ते पण पहिल्यांदाच जाणार आहेत.

हे ही वाचा >> Amit Thackeray: शिंदे सरकार असताना भोंग्याचा मुद्दा का लावून धरला नाही? अमित ठाकरे म्हणाले तुम्ही...

मी त्यांना म्हणालो तुम्ही दबाव घेऊ नका. माझी इच्छा आहे. शंभर टक्के तयारी आहे. तुम्हाला नाही वाटलं तर मी नाही उभं राहणार. मी पक्षाच्या बैठकीत बोललो, पक्षाला गरज असेल तर नेता म्हणून मी पण उभं राहायला तयार आहे. निवडणुकीत उभं नाही केलं, तर मी महाराष्ट्रभर प्रचार करेन. लिस्टमध्ये नाव येईल किंवा नाही येणार, याबाबत मला माहित नव्हतं. अमित ठाकरे निवडणुकीत उतरलेत तर मनसेनं ही निवडणूक गांभीर्याने घेतलीय, असा उद्देश होता का? यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले, प्रत्येक निवडणूक गांभीर्यानेच घेतली जाते. आता निवडणुकीत उतरून गांभीर्य जास्त आलंय, असं मला वाटत नाही. पण कुठेतरी आम्ही तयार आहोत", असंही अमित ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp