Sanjay Raut Chhagan Bhujbal : 17 नोव्हेंबरला ओबीसींची सभा घेण्यापू्र्वीच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे सांगत छगन भुजबळ यांनी राजकीय बॉम्ब टाकला. पण, यावर खासदार संजय राऊत यांनी वेगळी शंका उपस्थित केली. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत राऊतांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. राऊतांनी काही सवाल केले असून, भुजबळांचा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री शिंदेंना आहेत का? असंही त्यांनी म्हटलं आहे.
“राजीनामा देण्याचे नाटक”
’16 नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला’, या छगन भुजबळ यांच्या विधानावर खासदार संजय राऊत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. जर राजीनामा दिला आहे. तुम्हाला मंत्रिमंडळात काम करायचं नाहीये, तुम्हाला ओबीसींसाठी काम करायचं आहे आणि तुमचा राजीनामा मंजूर केला जात नाही, ही दोघांची मिलीभगत आहे. मी राजीनामा देण्याचे नाटक करतो, तुम्ही मंजूर करू नका. किंवा तुम्ही राजीनामा द्या आम्ही मंजूर करणार नाही.”
हेही वाचा >> भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo
“छगन भुजबळ आजकाल जे बोलत आहेत, हल्ली त्यांच्या तोंडातून जे निघत आहे; लोक म्हणतात की फडणवीस त्यांच्या मुखातून बोलत आहेत. मग त्यांचा राजीनामा कसा मंजूर होईल? पण, आमची ही भूमिका कायम राहिली आहे की, मंत्रिमंडळातील कुणी मुख्यमंत्री किंवा सरकार विरोधात भूमिका घेत असेल, तर त्याला मंत्रिमंडळ राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याला मंत्रिमंडळातून बाहेर करायला करावं”, अशी मागणी राऊत यांनी केली.
भुजबळांच्या भूमिकेवर राऊतांचे प्रश्न
“ओबीसी असो, मराठा असो, धनगर समाज असो… सगळ्यांना हक्क मिळायला हवं. कुणाचाही हक्क हिसकावून दुसऱ्याला देऊ नये अशी आमची भूमिका राहिली आहे. छगन भुजबळ असो, जरांगे पाटील असो किंवा इतर कुणी नेता… सर्व नेत्यांनी एकत्र बसून विरोधकांना सोबत घेऊन निर्णय घ्यायला हवा”, असा सल्ला राऊतांनी दिला.
हेही वाचा >> ‘हो झाडल्या मी गोळ्या…’, जाहीर कबुली देणारे आमदार गणपत गायकवाड आहेत तरी कोण?
‘छगन भुजबळांनी 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊन सभा घ्यायला सुरूवात केली’, या मुद्द्यावर राऊत म्हणाले की, “त्यानंतर ते मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सामील झालेले आहेत. भुजबळ हे ओबीसी समाजाची भूमिका मांडताहेत. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की, कुणाच्या ताटातलं काढून कुणाला मिळू नये”, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंना राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार आहे का?
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदेंना लक्ष्य केले. ते म्हणाले, “मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात. पण, ओबीसींच्या ताटातलं देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. भुजबळ यांनीही तीच भूमिका मांडली आहे, पण त्यासाठी महाराष्ट्रात इतका टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र ज्या पद्धतीने जातीयवादाच्या खाईत ढकलला जात आहे, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं नाही.”
हेही वाचा >> “शिवसेनाप्रमुखांच्या फोटो आणि खुर्चीची किंमत 10 हजार ठरवली”
“छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका सरळ सरळ सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मंत्री भूमिका घेतो, तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं. भुजबळ आता म्हणताहेत की, त्यांनी राजीनामा दिलाय आणि तो स्वीकारलेला नाही. भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की, देवेंद्र फडणवीस यांना आहे, हे स्पष्ट करावं लागेल”, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना डिवचलं.
ADVERTISEMENT