मालेगाव : राहुल गांधींंना माझं एक सांगणं आहे, सावरकर आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सोबत लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं ते येऱ्या गबाळ्याच काम नाही. या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फोडू नका. अन्यथा आपला देश हुकुमशाहीकडे गेलाच म्हणून समजा, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीरपणे सुनावलं. ठाकरेंची आज (रविवारी) मालेगावमध्ये शिवगर्जना सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत भाष्य केलं आहे. नुकतचं लोकसभेमधून निलंबन झाल्यानंतरही राहुल गांधींनी सावरकर यांच्याविषयी भाष्य केलं. मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर कोर्टात माफी मागण्याच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी सावरकर नाही, मी गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना जाहीरपणे सुनावलं. यावरुन आता काँग्रेस नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : Rahul gandhi : खासदारकी रद्द, राहुल गांधींचा बदलला ट्विटर बायो, बघा काय लिहिलं?
चंद्रकांत पाटील अन् चंद्रशेखर बावनकुळेही निशाण्यावर :
यावेळी ठाकरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मनावर दगड ठेवून आपण सत्तास्थापन केली आहे. याचा अर्थ ते शिंदे गटाला दगड म्हणाले होते. तर बावनकुळे म्हणाले होते की, शिंदे गटाला आपण 48 जागा देणार आहोत, आपल्याला भरपूर स्कोप आहे. यावर ठाकरेंनी बावनकुळेंना “अहो बावनकुळे तुमच्या नावाप्रमाणे मिंधे गटाला किमान 52 तरी जागा द्या”, असं म्हणतं उपहासात्मक टोला लगावला.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी नाशिक सोडून मालेगावच का निवडलं? काय आहे राजकीय रणनीती?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दिव्यदृष्टी :
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, काळोखात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी करतात. महिलांना शिव्या देतात… सुप्रिया सुळे यांना त्यांनी शिवीगाळ केली. तरीही मंत्री म्हणून निर्लजासारखे मांडीला मांडी लावून बसतात.. हे त्यांचे हिंदुत्व आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही नवीन नाही, असं म्हणतात, असंही ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT