Waqf Board: 'बक्कल तुटले, पळा पळा...', श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर का केली तुफान टीका?

मुंबई तक

09 Aug 2024 (अपडेटेड: 09 Aug 2024, 07:26 PM)

Shrikant Shinde Waqf Amendment Bill 2024:: वक्फ बोर्ड विधेयकावरून श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (UBT) वर तुफान टीका केली आहे. पाहा नेमकं श्रीकांत शिंदे काय म्हणाले.

वक्फ विधेयकावरुन श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर तुफान टीका

वक्फ विधेयकावरुन श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर तुफान टीका

follow google news

बातम्या हायलाइट

point

श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर तुफान टीका?

point

वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून श्रीकांत शिंदे विरोधकांवर संतापले

point

वक्फ बोर्ड विधेयकाचं नेमकं प्रकरण काय?

Shiv Sena MP Shrikant Shinde On Waqf Amendment Bill 2024: नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी (8 ऑगस्ट) लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 सादर केले. जिथे विरोधक या विधेयकाला 'मुस्लिम विरोधी' म्हणत विरोध करत आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे नेते हे विधेयक अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत समर्थन करत आहेत. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी हे विधेयक आणण्याची गरज का आहे याबाबत बोलताना बरंच समर्थन केलं. तसंच त्यांनी याच मुद्द्यावरून शिवसेना (UBT) वर देखील तुफान टीका केली. (shrikant shinde criticizes shiv sena thackeray group over waqf bill)

हे वाचलं का?

वक्फ विधेयकावरून श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर तुफान टीका

वक्फ विधेयकाबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (UBT) वर टीकेची झोड उठवली. 'मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाचे विधेयक असलेले वक्फ विधेयक लोकसभेत मांडले जात असताना UBT गटाचे सर्व 9 खासदार पळून गेले. कारण त्यांच्या विचारधारेतच गोंधळ आहे. कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला नाही, याचाच संभ्रम आहे.'

हे ही वाचा>> Udhhav Thackeray : ठाकरेंना मोठा झटका? दिल्ली दौऱ्याची Inside Story

'2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोठ्या विश्वासाने UBT गटाला मतदान केले. मात्र त्याच समाजासाठी महत्वाचे असलेले वक्फ विधेयक लोकसभेत मांडले जात असताना UBT गटाने त्याबाबत भूमिका न मांडता पळ काढला. मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आणि त्यांच्या पाठीत खंजीर त्यांनी खुपसला आहे. मुस्लिम समाजाने या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.' असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांवर निशाणा साधला.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, 'वक्फ जमिनीबाबत देशभरात 85 हजार खटले सुरू असल्याने हे विधेयक आणण्याची गरज होती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात 165 हून अधिक खटले सुरू आहेत.'

ते पुढे म्हणाले की, 'विरोधकांना वक्फ जमिनीवर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये नको आहेत, तर ते व्होट बँक खूश करण्यासाठी आणि समाजाला खुश करण्यासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत. मी या विधेयकाचे स्वागत करतो. तसेच, जे विरोध करत आहेत त्यांनाही मी या विधेयकाला पाठिंबा देण्यास सांगेन.' असंही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> Eknath Shinde : शिंदेंच्या खासदाराच्या अडचणी वाढणार? हायकोर्टात याचिका; नेमकं प्रकरण काय?

दुसरीकडे काँग्रेसने हे विधेयक संविधानावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत मंदिर बोर्डाची स्थापना करण्यात आली. पण यामध्ये एखादा बिगर-हिंदू त्याचा सदस्य होऊ शकतो का? मग वक्फ परिषदेत बिगर मुस्लिम सदस्याची चर्चा का?'

केसी वेणुगोपाल यांनी दावा केला की, 'हे विधेयक आस्था आणि धर्माच्या अधिकारावर हल्ला आहे. आता तुम्ही मुस्लिमांवर हल्ले कराल, मग ख्रिश्चनांवर हल्ले कराल, मग जैनांवर हल्ले कराल.'

    follow whatsapp