Udhhav Thackeray On PM Modi : ‘आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो. आजही आम्ही शत्रू नाही आहोत. आम्ही तुमच्या सोबत होतो’, असे विधान ठाकरे गटाचे (UBT)प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी रविवारी कोकण दौऱ्यात केले होते. ठाकरेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खूप चर्चा सूरू आहे. तसेच ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Pm Narendra Modi) सावध भूमिका घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. त्यातच नुकतीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांनी युटर्न घेऊन इंडिया आघाडीला धक्का देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. नितीश कुमारांच्या या युटर्न नंतर आता इंडिया आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. असे असताना ठाकरे देखील युटर्न घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाली आहे. (udhhav thackeray says pm modi bjp not our enemy nitish kumar bihar politics maharashtra politics)
ADVERTISEMENT
ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी रविवारी सावंतवाडीत बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो. आजही आम्ही शत्रू नाही. आम्ही तुमच्या सोबत होतो’. शिवसेना तुमच्यासोबत होती. गेल्या वेळी आम्ही आमच्या युतीचा प्रचार केला होता. विनायक राऊतसारखे आमचे खासदार निवडून आले म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात. पण नंतर तुम्ही आमच्यापासून दुरावलात. आमचे हिंदुत्व आणि भगवा ध्वज अजूनही शाबूत आहे, असे ठाकरे म्हणाले होते.
हे ही वाचा : Rajya Sabha election 2024 : काँग्रेसला निवडणुकीत बसणार धक्का?
दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात खूप चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर ठाकरेंच्या या भूमिकेला नितीश कुमारांच्या राजकारणाशी देखील जोडून पाहिले जात आहे. नितीश कुमार इंडिया आघाडीचा भाग होते. मात्र अचानक त्यांनी भूमिका बदलून भाजपशी हातमिळवणी केली होती. या भूमिकेच्या वेळेस नितीश कुमारांचे सुर बदलले होते. त्यामुळे अशाच बदलाचा सुर आता ठाकरेंनी आवळलाय का? अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
खरं तर राज्यात महाविकास आघाडीत समन्वय दिसतोय. मात्र इंडिया आघाडीत कोणताच समन्वय दिसून येत नाही. जागा वाटपावरुन वाद, अनेक ममता बँनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’ त्यात नितीश कुमारांची भाजपशी हातमिळवणी…या सर्व घटनांमुळे भाजप इंडिया आघाडी खिळखिळी करण्यात यशस्वी ठरली आहे. अशा परिस्थितीत ठाकरे भाजप सोबत जाण्याची म्हणजेच, युटर्न घेण्याची तयारी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT