Mood of The Nation Narendra Modi Popularity : आगामी लोकसभा निवडणुकीत कोण जिंकेल, कुणाला किती यश मिळेल, याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पण, देशाचा मूड काय आहे, याबद्दलचा एक ओपिनियन पोल समोर आला आहे. मूड ऑफ द नेशनमधून लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे असतील, याबद्दलचे अंदाज मांडण्यात आले आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या लोकप्रियतेच्या कारणांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर जाणून घेऊयात मोदींच्या लोकप्रियतेची कारणं काय आहेत.
ADVERTISEMENT
इंडिया टुडे आणि सी व्होटर सर्व्हेने संयुक्तपणे एक सर्व्हेक्षण केले. हे सर्व्हेक्षण देशातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आलं. तब्बल दीड लाख लोकांना यात सहभागी करून घेण्यात आलं. तर ३५ लोकांशी प्रत्यक्ष बोलून माहिती संकलित करण्यात आली. त्या आधारावर हा पोलचे निष्कर्ष काढण्यात आले. त्यात मोदींच्या लोकप्रियतेच्या मुद्द्याचाही समावेश आहे.
कोणत्या निर्णयामुळे मोदींची प्रतिमा लोकप्रिय झाली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकप्रिय करण्यात लोकांना त्यांचे काही निर्णय महत्त्वाचे वाटतात. ते नेमके कोणते, ते बघा
1) सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी पाच टक्के लोकांचं मत आहे की, भ्रष्टाचार लगाम लावणे, हे मोदींच्या लोकप्रियतेचं कारण आहे.
2) 6 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, कोरोना काळात मोदी सरकारने चांगलं काम केले.
3) इतर 6 टक्के लोकांचं मत आहे की, नोटबंदीच्या निर्णयामुळे मोदींची देशात लोकप्रियता वाढली.
4) 9 टक्के लोकांचे असे मत आहे की, पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोदींची प्रतिमा लोकप्रिय झाली.
5) 12 टक्के लोकांना वाटतं की, जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढली.
6) 19 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उजळली. भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 परिषदेमुळे मोदींची लोकप्रियता वाढली.
7) मोदींच्या लोकप्रियतेच्या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे राम मंदिर. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 42 टक्के लोकांनी असं मत मांडलं की, अयोध्येत अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर उभारल्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढली.
राम मंदिर प्रमुख मुद्दा
सर्व्हेंमधील आकड्यानुसार राम मंदिर उभारण्याचा मुद्द्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढली. जवळपास निम्म्या लोकांचे मत तसेच आहे. त्यामुळे या मुद्द्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसू शकतो.
ADVERTISEMENT