CEO Venky Mysore On KKR Skipper: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरला 23 कोटींमध्ये खरेदी करून धमाका केला. अय्यरला संघात सामील केल्यानंतर क्रीडा विश्वात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. व्यंकटेश अय्यर की अजिंक्य रहाणे, कोणाला केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल? असा सवाल उपस्थित झाला असतानाच केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. वेंकी यांनी केकेआरच्या नव्या कर्णधाराबाबत मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
केकेआरचे सीईओ वेंकी मैसूरने म्हटलं की, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, आम्ही बैठक घेउऊन याबाबत निर्णय घेऊ. कधी कधी अशा प्रकारच्या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला नीट विचार करावा लागतो. संपूर्ण परिस्थितीकडे पाहावं लागतं. संघाच्या हिताचं काय आहे? याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. एक योग्य निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास आहे.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?
व्यंकटेश अय्यरने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, कर्णधाराचं आव्हान स्वीकारण्यात मला आनंद वाटेल. नितीश राणाच्या अनुपस्थितीत मला संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मी उपकर्णधारही होतो. कर्णधार फक्त एक टॅग आहे, असं मला वाटतं. पण संघात नेतृत्वाचा असा माहोल करायचं आहे, ज्यामुळे प्रत्येकाला वाटेल की मी या संघासाठी काहीतरी योगदान देऊ शकेल.
हे ही वाचा >> Mumbai Today Whether Update: आरारारा! मुंबईत कडाक्याची थंडी, 8 वर्षानंतर पहिल्यांदाच हुडहुडी वाढली, कारण...
कोलकाताची संपूर्ण टीम
रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंग, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज़, एनरिक नॉर्टजे, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मारकंडे, रोवमेन पॉवेल, मनीष पांडे, स्पेंसर जॉनसन, अजिंक्य रहाणे, लवनिथ सिसोदिया, अनुकूल रॉय, मोइन अली, उमरान मलिक
ADVERTISEMENT