Manoj Jarange : ‘तुम्ही विचार करायचा होता ना?’, जरांगे पाटलांनी पकडलं कात्रीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

News about maratha reservation : Manoj Jarange Patil firm on his stand.
News about maratha reservation : Manoj Jarange Patil firm on his stand.
social share
google news

Manoj Jarange Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीबद्दल मनोज जरांगे ठाम असल्याने शिंदे सरकारचं टेन्शन वाढलं आहे. कॅबिनट मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. त्यानंतर शेलू येथे माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सरकारला उलट सवाल केला.

ADVERTISEMENT

मुंबईत 144 कलम लागू केलं आहे. यावर जरांगे म्हणाले, “मुंबईला जाण्याची घोषणा आम्ही कधी केली? ते मनाने काहीही करतील. त्यांनाच वाटतं की मराठ्यांनी मुंबईत यावं. येतो. काही अडचण नाही. तुम्ही १४४ का लागू केलं? नोटिसा का दिल्या? याचा अर्थ असाच आहे.”

हेही वाचा >> जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा ठणकावले, ’54 लाख मराठे ओबीसी…’

“मी प्रामाणिकपणाने सांगतो, त्यांनी नोटिशीच्या भानगडीत पडू नये. त्यामुळे काय होतंय की, नोटीस मिळणारा म्हणतोय की, जस व्हायचं तसं. कारण नोटीस मिळणाऱ्याला असं वाटतं की, मी कशात नसून? सरकारने हे समजून घ्यावं. त्यांनी विनाकारण खवळवू नये”, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

हे वाचलं का?

रक्ताचे नाते म्हणजे काय? जरांगेंचा सरकारला सवाल

जरांगे शिंदे सरकारला म्हणाले, “दोन दिवसांत काही केलं नाही, तर पुढची दिशा ठरवणार आहे. आईची जात लावा, याचा अर्थ विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत. तिकडे कुणबी आरक्षण आहे. त्यामुळे तिच्या मुलाला आरक्षणाचा लाभ घेता यावा. तिच्या मुलालाच लाभ घेत येत नसेल, तर केवढी मोठी शोकांतिका आहे. रक्ताचे नाते म्हणजे काय? काल मी हा विषय विचारला”, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >> काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यामध्ये ठिणगी! वडेट्टीवार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांवर भडकले

“पेचप्रसंग व्हायला शब्द मी लिहिला नाही. तुम्ही लिहिला. शब्द लिहून घेताना कायदा बनवणारेच होते. कायद्याचे अभ्यासकही होते. त्यांच्या पेक्षा कोण हुशार आहे, यात माझी काय चूक. तुम्ही शब्द लिहिला आहे. लिहितानाच तुम्ही विचार करायचा होता ना? त्यांच्यात कुणी अज्ञानी नव्हते ना? कायदा राबवणारे, कायदा करणारे लोक होते, तुम्ही शब्द लिहिला. सोयरा म्हणजे पुतण्या असे ते म्हणाले. पुतण्या सोयरा असतो का? तुम्ही पागल समजता का तुम्ही आम्हाला?”, असा संतप्त सवाल जरांगे पाटलांनी केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT