बाबासाहेबांचा ‘तो’ इशारा! …म्हणून आंबेडकरांनी नाकारलं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण
प्रकाश आंबेडकर अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण यानिमित्ताने प्रकाश आंबेडकरांनी करून दिली आहे.
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar Ram Mandir Pran Pratishtha : ‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर मी अयोध्येला दर्शनासाठी येईन’, असं शरद पवारांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्या हजर राहण्यास नकार दिला. तर ‘भाजप आणि आरएसएसने वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनवला आहे’, असे सांगत काँग्रेसने सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अशीच भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतलीये. पण, त्यांनी नकार देताना दिलेल्या कारणाची चर्चा जास्त होतेय. प्रकाश आंबेडकर काय म्हणालेले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला तो इशारा काय? हे जाणून घ्या…
ADVERTISEMENT
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी प्रकाश आंबेडकर यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. पण, आमंत्रण दिल्याबद्दल आभार मानत प्रकाश आंबेडकर यांनी कार्यक्रमाला हजर राहण्यास नकार दिला.
हेही वाचा >> किती होते उमेदवारी, किती होते पक्ष, देशात पहिली लोकसभा निवडणूक कशी झाली होती?
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात काय म्हटलंय?
प्रिय श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अयोध्या,
विषय : श्री राम जन्मभूमी अयोध्या प्राणप्रतिष्ठा समारंभ आमंत्रण पत्र
श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा आमंत्रणसाठी तुमचे आभार.
कथित सोहळ्यात मी सहभागी होणार नाही. हजर न राहण्याचं कारण हे आहे की, भाजप आणि आरएसएसने हा कार्यक्रम हडप केला आहे. एक धार्मिक सोहळा निवडणुकीतील फायद्यासाठी एक राजकीय अभियान बनला आहे.
माझे पणजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावध केले होते की, ‘जर राजकीय पक्षांनी धर्म, पंथाला देशापेक्षा जास्त प्राधान्य दिलं, तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल. आणि यावेळी कदाचित आपण तो कायमस्वरूपी गमावून बसू.” आज ही भीती खरी ठरली आहे. धर्म, पंथाला देशापेक्षा वर ठेवणारे भाजप-आरएसएस त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम ताब्यात घेऊन बसली आहे.
जय फुले… जय सावित्री… जय शाहू… जय भीम
देशापेक्षा धार्मिकतेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य -आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्याचा उल्लेख करत सरकारच्या राजकारण धार्मिकतेच्या मुद्द्याकडे झुकत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या इशाऱ्यातून आंबेडकरांनी मोदी सरकारचे देशापेक्षा जास्त महत्त्व धर्माला असल्याचेही आंबेडकरांनी बोलून दाखवलं आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘राम दर्शनासाठी अयोध्येला येईन, पण…’; पवारांनी भूमिका केली जाहीर
काँग्रेसची भूमिका काय?
यापूर्वी काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार दिला होता. काँग्रेसने म्हटलेले आहे की, “भगवान रामांची पूजा कोट्यवधी भारतीय करतात. धर्म हा माणसाचा व्यक्तिगत विषय आहे. पण, भाजप आणि आरएसएसने वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनवला आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की अर्धवट काम झालेल्या मंदिराचं उद्घाटन केवळ निवडणुकीत लाभ घेण्यासाठीच केले जात आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT