Solapur : मोबाईल ठरला तरुणाच्या आत्महत्येचं कारण, शेतात घेतला गळफास

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

solapur parents did not give mobile phones 12th student boy commit suicide shocking story
solapur parents did not give mobile phones 12th student boy commit suicide shocking story
social share
google news

Solapur Suicide News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 18 वर्षीय आकाश पुजारीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाशने त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. या आत्महत्येने पुजारी कुटुंब आणि गावात हळहळ व्यक्त होत आहे. (solapur parents did not give mobile phones 12th student boy commit suicide shocking story)

ADVERTISEMENT

सोलापूर जिल्ह्यातील कुसुर तालुक्यात ही घटना घडली आहे. आकाश हा त्याचे आई-वडील आणि भाऊ-वहिणीसह घरी राहत होता. यावेळी 29 सप्टेंबरला विसर्जन मिरवणूकीसाठी संध्याकाळी 6 वाजता आकाश घराबाहेर पडला होता. मात्र रात्री कुटुंबाचे जेवण होऊन देखील तो रात्रभर घरी परतलाच नव्हता. कुटुंबियांना त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मिरवणूकी निघत असल्याने आकाश मित्रासोबत असल्याचे वाटले आणि त्यामुळेच तो दिवसभर घरी परतला नसल्याचा अंदाज त्यांनी बांधला होता.

हे ही वाचा : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?

मात्र दुसऱ्या दिवशी पुजारी कुटुंबियांसाठी वाईट बातमी आली. 30 सप्टेंबरला वडील राजकुमार पुजारी यांना मोबाईवर एक कॉल आला. या कॉलमध्ये आकाश याने शेतात गळफास घेतल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच वडील तत्काळ शेतात दाखल झाले. यावेळी आकाशने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. यावेळी त्याला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आत्महत्ये मागचं कारण काय?

आकाश पुजारी हा मंद्रूप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. यावेळी आकाश आई-वडिलांकडे सतत मोबाईलची मागणी करत होता. पण आर्थिक परिस्थिती बेताचाी असल्या कारणाने आई-वडील आकाशला मोबाईल देऊ शकत नव्हते. त्यामुळे सततच्या मागणीनंतरही मोबाईन न मिळत असल्याने आकाशने कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.

आकाशच्या आत्महत्येनंतर आता पुजारी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचसोबत सोलापूरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nanded Hospital : नांदेडमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू का झाला? खरंच औषधी नव्हती का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT