आरारारा खतरनाक! रेल्वे फाटक बंद झालं..चक्क बाईकच खांद्यावर उचलून पलीकडे गेला, बाहुबलीचा Video व्हायरल
सोशल मीडियावर स्टंटबाजीचे व्हिडीओ व्हायरल झालेले अनेकदा पाहिले असतील. परंतु, या व्हिडीओंपेक्षाही खतरनाक आणि आगळावेगळा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

खांद्यावर बाकई उचलणाऱ्या बाहुबलीचा व्हिडीओ पाहिलात का?

रेल्वे फाटक बंद होताच पठ्ठ्याने नेमकं काय केलं?

व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा होतोय वर्षाव
Man Picked Bike On Shoulder Viral Video : सोशल मीडियावर स्टंटबाजीचे व्हिडीओ व्हायरल झालेले अनेकदा पाहिले असतील. परंतु, या व्हिडीओंपेक्षाही खतरनाक आणि आगळावेगळा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, रेल्वे फाटक बंद झाल्यावर एका व्यक्तीने चक्क बाईकच खांद्यावर उचलून घेतली आणि तो रेल्वे ट्रॅक ओलांडून बाहेर गेला. पठ्ठ्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या बाहुबलीवर कौतुकाची थाप टाकली आहे. तर काहींनी या व्यक्तीने नियम तोडल्याने टीकेची झोड उठवलीय.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, रेल्वे क्रॉसिंगवर एक फाटक बंद आहे. त्याचवेळी एक व्यक्ती आपल्या बाईकला आरामात उचलतो आणि खांद्यावर ठेवतो. त्यानंतर तो व्यक्ती बाईक खांद्यावर घेऊन रेल्वे ट्रॅक ओलांडतो. त्या व्यक्तीने अगदी सहजपणे बाईक खांद्यावर उचलून रेल्वे ट्रॅक पार केलं आहे, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा 18 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
हे ही वाचा >> बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत? कारण वाचून लोटपोट हसाल
खांद्यावर बाईक उचलणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
व्हिडीओत दिसत आहे की, रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला लोक उभे आहेत. परंतु, हा पठ्ठ्या रेल्वे फाटक ओपन व्हायची वाट पाहत नाही, तर चक्क बाईक खांद्यावर घेऊन ट्रॅक ओलांडतो. या व्हिडीओला 5 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Pune: भर चौकात नको ते करणाऱ्या गौरव अहुजाची कुंडलीच आली समोर, हा तर...
हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, भारतात रेल्वे क्रॉसिंगवर आणखी एक दिवस. हा व्यक्ती कशाप्रकारे रेल्वे क्रॉस करत आहे, तुम्ही व्हिडीओत पाहू शकता..व्हिाडीओला कमेंट करत राधे नावाच्या यूजरने लिहिलंय, देशी तुपाची पावर आहे. तर दूसऱ्या यूजरने म्हटलं, भारतात सेफ्टी फर्स्ट नाही, तर सेफ्टी थर्ड आहे. याशिवाय अन्य काही यूजरने म्हटलंय, हा तर बाहूबलीच आहे. आता भारतात ब्रिज बनवण्याची गरज नाही, असंही एका यूजरने म्हटलं आहे.