Manoj Jarange : रुग्णालयातून बाहेर पडताच जरांगेंचा फडणवीसांवर हल्ला, 'आरक्षण एका हाताने देतो अन्...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

'गावं आहे माझं, इतकं गृहमंत्र्यांच थोडं दडपण आहे. तसेच गृहमंत्र्यांनी शिथील केली असेल बहुतेक, कारण इतक्या दिवस राहण काय शक्य नाही', असे जरांगे म्हणाले आहेत.
manoj jarange patil criticize devendra fadnavis on maratha reservation on obc demand gunaratna sadavarte
social share
google news

Manoj Jarange Criticize Devendra Fadnavis : इसरार चिश्ती, जालना :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन चिघळल्याने जरांगे पाटलांनी आंदोलनाला स्थगिती देऊन उपचारासाठी थेट रुग्णालय गाठले होते. यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगेंनी (Manoj Jarange) देवेंद्र फडणवीसांवर  (Devendra Fadnavis)जोरदार हल्ला चढवला आहे.  (manoj jarange patil criticize devendra fadnavis on maratha reservation on obc demand gunaratna sadavarte) 

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटलांनी आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर त्यांनी अंतरवालीत जाण्यापुर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझी तब्येत चांगली आहे. दोन दिवस आता गावाकडे थोडा आराम करेन, असे जरांगेंनी सांगितले. तसेच जर गृहमंत्र्यांनी दडपशाहीने लावलेली संचारबंदी गावात उठवली तर समजाला भेटायला आवडेल आणि जर संचारबंदी लागूच असेल, तर समाजाला एकच विनंती आहे. आपण येऊ नका,आपल्याला कायद्याचे पालन करायचे, असे आवाहन जरांगे पाटलांनी माध्यमांना केले आहे.  तसेच संचारबंदीवर बोलताना जरांगे म्हणाले की, 'गावं आहे माझं, इतकं गृहमंत्र्यांच थोडं दडपण आहे. तसेच गृहमंत्र्यांनी शिथील केली असेल बहुतेक, कारण इतक्या दिवस राहण काय शक्य नाही', असे जरांगे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : बामणी कावा.. पवारच माझ्या जातीवर जातात: फडणवीस

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या 10 टक्के आरक्षणाला कोर्टात आव्हान दिलं आहे, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ''हे माहित होतं आम्हाला, फडणवीस साहेब एका हाताने देणार आणि दुसऱ्या हाताने याचिका दाखल करायला लावणार, अशी टीका जरागेंनी फडणवीसांवर केली. कारण ते श्रद्धेय आहे त्यांचे, सदावर्ते साहेब नेहमी त्यांनी श्रद्धेय देवेंद्र फडणवीस म्हणत असतात. जीवा भावाचा माणुस असल्यावर होतात या गोष्टी, असा टोला देखील जरांगेंनी फडणवीसांना लगावला. 

हे वाचलं का?

पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करणे. सगेसोयऱ्यांमुळे ओबीसीच्या जितक्या जाती आहेत, त्या त्याच्यात येणार आहे. त्यामुळे जे आरक्षणापासून वंचित राहिले आहेत,ते सुद्धा त्याच्यामध्ये येतील. म्हणून मी नुसत मराठ्यांच्या सगेसोयऱ्याचे काम केलं नाही, तर सगळ्या जातींचे काम केले आहे. सगेसोयऱ्याच्या मागणीवर मी कायमस्वरूपी ठाम आहे. आणि मी ठाम राहणार अशी भूमिका जरांगेंनी मांडली. 

हे ही वाचा : 'आधी तयारी करून...', घोसाळकरांची हत्या, फडणवीसांनी सांगितली सगळी कहाणी

मराठा समाज मागास ठरला आहे, तुम्हाला तो ओबीसी आरक्षणात घ्यावा लागेल आणि त्याची मर्यादा मोदी साहेबांकडून वाढवून घ्यावी लागेल. 102 वी, 103 वी 105 वी घटना दुरुस्ती करावी लागेल. जर शिंदे साहेबांचे म्हणणे आहे, जर राज्याला अधिकार दिले असले, असे तर ओबसी आरक्षणाला 10 टक्के घ्यायला अडचणच नाही, असे देखील जरांगेंनी सांगितले. 

ADVERTISEMENT

मराठ्यांच्या नेते माझ्याविरूद्ध भांडायला लागले, मला अटक करण्याासाठी षडयंत्र रचायला निघालेत. मराठ्यांच्या पोराचे मुडदे पाडायला निघालेत. त्यांनी जर शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सोबत घेऊन जर दिल्लीला जाऊन त्याची मर्यादा वाढवली, तर बरं होईल, म्हणजे ते दोन ते अडिचशे देता येईल. तसेच सगेसोयरे, गँझेट, गुन्हे मागे घेणे या मागण्या मान्य कराव्या मग आंदोलन करायची गरज नाही आणि राजकारण तर आम्ही करत नाही,असे जरांगे म्हणाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT