Ratan Tata Death: उद्योगपती रतन टाटा गेल्याने जगभरात शोककळा, राजकीय नेत्यांकडून हळहळ!
Ratan Tata Passed Away : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण 'रतन टाटा' यांनी बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री वयाच्य 86व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दुर्मिळ 'रत्न' हरपले! राजकीय वर्तुळातून श्रद्धांजलीच्या प्रतिक्रिया
गपती रतन टाटा गेल्याने जगभरात शोककळा
राज ठाकरेंनी चित्रफीत पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
Ratan Tata Passed Away : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण 'रतन टाटा' यांनी बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री वयाच्य 86व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर आज राज्यभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय क्रार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रतन टाटांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून श्रद्धांजलीच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Ratan Tata Death mourns across the world reactions from maharashtra political leaders expressing condolence cm eknath shinde mns raj thackeray devendra fadnavis)
ADVERTISEMENT
दुर्मिळ 'रत्न' हरपले! राजकीय वर्तुळातून श्रद्धांजलीच्या प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदी श्रद्धांजली अर्पण करत म्हणाले आहेत की, "रतन टाटा जी एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व प्रदान केल. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय झाले."
शरद पवार म्हणाले आहेत की, "जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचे लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली"
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Ratan Tata Death: दुर्मिळ रत्न हरपले! रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा!
तर, रतन टाटा यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "दुर्मिळ रत्न हरपले. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला," असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनीही रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, "रतन टाटा सर यांच्या निधनाने फक्त हिंदुस्थाननेच नाही तर मानवतेने एक दयाळू नेता गमावला आहे. ते अत्यंत मोठ्या मनाचे एक, बलाढ्य उद्योगपती होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो".
ADVERTISEMENT
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना हर्ष गोयंका यांनी पोस्ट केलिये की, “घड्याळाची टिक टिक थांबली आहे. टायटनचे निधन झाले. रतन टाटा हे सचोटीचे, नैतिक नेतृत्वाचे आणि परोपकाराचे उदाहरण होते, ज्यांनी व्यवसायाच्या जगावर आणि त्याहूनही पुढे एक अमिट छाप सोडली आहे. तो आमच्या आठवणींमध्ये नेहमीच उंच राहील. RIP.", असं देखील गोयंका म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून आज शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
हेही वाचा : Ratan Tata passes away: रतन टाटा यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी! तुम्हालाही नसतील माहित...
राज ठाकरेंनी चित्रफीत पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
'नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात, आम्ही अनेक प्रकल्प सीएसआर निधीतून उभारले. आणि नाशिक सुंदर करावं म्हणून ज्या ज्या कल्पना मी देशातील नामवंत उद्योजकांसमोर मांडल्या, त्या प्रत्येकाने मला तात्काळ होकार दिला. नाशिकमध्ये एक बोटॅनिकल उद्यान सुरु करावं अशी माझी इच्छा होती, त्यासाठी मी रतन टाटांना सीएसआरमधून निधी द्यावा अशी विनंती केली आणि त्यांनी मला लगेच होकार दिला. इतकंच नाही सुरुवातीला जो निधी मंजूर केला त्यापेक्षा अधिक निधी काम वाढतंय म्हणून लागणार आहे हे पाहून, तो निधी पण मंजूर केला.
बोटॅनिकल उद्यान पूर्ण झाल्यावर मी रतन टाटांना विनंती केली तुम्ही स्वतः या उद्यानाला भेट दिलीत तर उत्तम होईल. खरंतर जागतिक पातळीवर काम करणारे उद्योगपती असं सहजासहजी कुठे जात नाहीत, पण रतन टाटा नाशिकला आले. त्यांनी आम्ही उभारलेलं उद्यान पाहिलं. आणि नंतर माध्यमांशी बोलताना, माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये कौतुक होतं, पण मला तो त्यांनी दिलेला आशीर्वाद वाटला. मी भाग्यवान आहे रतन टाटांसारख्या अनेक दिग्गजांनी मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले.' असं ट्वीवट राज ठाकरे यांनी पोस्ट केलं आहे.
ADVERTISEMENT