आप्पासाहेबांच्या घराण्याला ‘धर्माधिकारी’ आडनाव नेमकं कोणी दिलेलं… ‘शांडिल्य’ आडनाव कसं बदललं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

who exactly gave the surname dharmadhikari to appasaheb family how did the surname shandilya change
who exactly gave the surname dharmadhikari to appasaheb family how did the surname shandilya change
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan)पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेमुळे आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) हे नाव महाराष्ट्रभरात अचानक चर्चेत आलं. आप्पासाहेब धर्माधिकारी कोण, त्यांचं नेमकं समाजकार्य काय.. त्यांच्या चालणाऱ्या श्री समर्थ बैठकांचं (Shree Samrath Baithak) स्वरुप कसं असतं.. या सगळ्याविषयी अनेक जण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आम्ही तुम्हाला आप्पासाहेबांविषयी एक खास गोष्ट सांगणार आहोत. ती म्हणजे त्यांच्या आडनावाची. खरं तर आप्पासाहेब किंवा त्यांचे कुटुंबीय जे ‘धर्माधिकारी’ हे आडनाव लावतात ते त्यांचं मूळ आडनावच नाही. होय.. त्यांचं खरं आडनाव हे शांडिल्य होतं. पण यामागे एक कथा आहे. जी त्यांच्याकडून देखील सांगितली जाते आणि याचबाबत महाराष्ट्र भूषण सोहळ्यात स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील भाष्य केलं. तर जाणून घेऊयात आप्पासाहेबांच्या घराण्याला धर्माधिकारी हे आडनाव नेमकं दिलं तरी कोणी. (who exactly gave the surname dharmadhikari to appasaheb family how did the surname shandilya change)

ADVERTISEMENT

आप्पासाहेबांचे वडील म्हणजेच नारायण विष्णू धर्माधिकारी यांनी श्री समर्थ बैठकांची मुहूर्तमेढ रोवली. याच निमित्ताने त्यांनी लाखो श्री सदस्य आपल्या समर्थ बैठक परामार्थशी जोडले. त्यामुळे देशातच नव्हे तर परदेशात देखील त्यांची किर्ती पोहचली. दासबोधाच्या माध्यमातून त्यांनी निरुपणाला सुरुवात केली. त्याच माध्यमातून शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांनी काम केलं. त्यांचा हाच वारसा त्यांनी आपले ज्येष्ठ पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला.

हे ही वाचा>> नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी का.. तेही आप्पासाहेबांच्याच घरातील?

नानासाहेबांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेबांनी त्यांची समर्थ बैठकीची परंपरा ही पुढे नेली. तसंच त्याला आणखी योग्य पद्धतीने पुढे नेण्यासाठी काही गोष्टींची मांडणी केली. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि राज्य सरकारने नुकताच महाराष्ट्र भूषण देऊ केला.

हे वाचलं का?

धर्माधिकारी आडनाव कसं मिळालं?

याबाबत एक कथा अशी सांगितली जाते की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्याला साधारण 400 वर्षांचा इतिहास आहे. आप्पासाहेबांच्या आधीच्या आठव्या पिढीतील त्यांचे पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य हे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचं आडनाव हे धर्माधिकारी नव्हे तर शांडिल्य होतं. याचबाबतचा नेमका इतिहास काय आहे हे स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील कार्यक्रमात बोलताना सांगितला होता.

ADVERTISEMENT

पाहा देवेंद्र फडणवीसांनी धर्माधिकारी हे आडनाव कसं मिळालं याचा इतिहास सांगताना नेमकं काय म्हटलेलं:

‘मी सहज इतिहासाचं अवलोकन करत होतो. त्यावेळी एक गोष्ट आप्पास्वारी माझ्या वाचण्यामध्ये आली की, मुळात आपल्या घराण्याचा इतिहास हा 450 वर्षांचा इतिहास आहे. आणि आपल्या आठ पिढ्यांपूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य. हे महाराजांच्या काळात धर्मजागृतीचं काम करत होते. आणि त्यांचं धर्म जागृतीच्या कामाचं जे काही स्वरुप होतं.. ते पाहिल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितलं की, आपण केवळ शांडिल्य नाही तर आपण खऱ्या अर्थाने धर्माधिकारी आहात.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीतील अधिष्ठान म्हणजे काय.. श्री सदस्यांना कसं मिळतं?

‘तेव्हापासून महाराजांच्या प्रेरणेनं हे धर्माधिकारी नामाबिरुद याठिकाणी लागलं. तिथपासून पिढ्यांपिढ्या आज हे कार्य या ठिकाणी धर्म जागरणाचं आपल्या माध्यमातून होतंय. ही खरोखर अत्यंत मोठी गोष्ट आहे.’ असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले होते.

तेव्हापासून आजतागायत आप्पासाहेबांचं घराणं हे धर्माधिकारी हे आडनाव लावत आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी चालवत असलेली श्री समर्थ बैठक म्हणजे काय?

नानासाहेब धर्माधिकारी आणि सुरुवातीच्या काळात आपल्या ओघवत्या वाणीने निरुपणाला सुरुवात करत बैठकीची स्थापना केली होती. यावेळी नानासाहेबांनी प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित, व्यसनाच्या आहारी गेलेल्या आणि अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या लोकांना आपल्या निरुपणाच्या माध्यमातून समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.

हळूहळू याची व्याप्ती प्रचंड वाढत गेली. त्यानंतर राज्यभरात तालुका-तालुक्यात बैठक स्थापना झाली. त्यानंतर देशभरात आणि परदेशात देखील समर्थ बैठकींना सुरुवात झाली.

समर्थ बैठकीत दिलं जाणारं निरुपण हे प्रामुख्याने समर्थ रामदासरचित दासबोधावर असतं. यामधील प्रत्येक समासावर आठवड्यातील एक दिवस निरुपण केलं जातं. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या बैठक असतात. तर लहान मुलांसाठी बालभक्ती बैठकही असते.

काम-क्रोध अशा सात विषय-विकारांवर प्रामुख्याने निरुपण केलं जातं. प्रत्येकाने मनातील विषय-विकारांचा त्याग करून निर्मळपणे वागावं असं या निरुपणांमधून सांगितलं जातं. अनेक श्री सदस्यांचा असा दावा आहे की, जेव्हा पासून ते बैठकीला जाऊ लागले आहेत तेव्हापासून ते व्यसनांपासून मुक्त झाले आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस बैठकीच्या श्री सदस्यांची संख्या ही वाढतच चालली आहे.

हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?

आप्पासाहेब देखील निरुपणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, स्त्रीसन्मान, हुंडाप्रथा याबाबत प्रबोधन करतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूरसारख्या देशात त्यांच्या बैठका होतात. महाराष्ट्रातील खेडोपाड्यांसह आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या पाड्यांवर बैठकांसह विविध कार्यक्रमांचं विशेष आयोजन केलं जातं. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या विविध स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीरांच्या कार्यक्रमांचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT