सेल्फीनं घेतला जीव! महाबळेश्वरमध्ये दरीत कोसळून पुण्याची महिला ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mahabaleshwar selfie incident female tourist killed after falling into valley while taking
mahabaleshwar selfie incident female tourist killed after falling into valley while taking
social share
google news

पाचगणी : महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) सेल्फी (Selfie) घेताना दरीत कोसळून एका महिला पर्यटक ठार (Female tourist death) झाल्याची घटना आज घडली. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती सांगण्यात आले आहे. अकिंता सुनिल शिरसकर (ankita sunil shiraskar) (वय 23) असे तिचे नाव आहे. तीनशे फूट खोल दरीत (deep valley) महिलेचा मृतदेह आढळून आला असून त्यानंतर घटना घडल्यानंतर मदतीसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले.

ADVERTISEMENT

केट्स पॉईंटवर घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अकिंता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आली होती. ती दोघंही दुचाकीवरुन आले होते. यावेळी केट्स पॅाईंट (Kate’s Paint) परिसरातील नीडल होल पॉईंट (Needle hole point) येथे जाऊन ती दोघंही सेल्फी घेत होती. त्यानंतर मृत पर्यटक महिलाही आपले स्वतंत्र सेल्फी घेत होती. त्यावेळी तिचा तोल जावून ती दरीत कोसळली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा >>Ajit Pawar यांचा मोठा निर्णय, बँक संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा

बचावकार्यासाठी धावाधाव

घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर बचावकार्यास सुरुवात करण्यात आली. या दोन्ही टीमकडून प्रयत्न करुन दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत पडलेल्या महिलेचा मृतदेह आढळला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पर्यटनाला आले आणि…

पुण्याची महिला पर्यटनासाठी महाबळेश्वरमध्ये आली असताना ही दुर्घटना घडली. मात्र पती-पत्नी दोघंही फिरत असताना त्यांनी अनेक ठिकाणी आपले फोटो काढले होते. मात्र केट्स पॅाईंटवर आल्यावर महिला दरीच्या सुरक्षा कठड्यावर उभी राहून ती सेल्फी घेत होती. त्यावेळी अचानक तिचा तोल जाऊन ती थेट दरीत कोसलळी.

हे ही वाचा >> Cabinet Meeting Decision: शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय

पर्यटकांमध्ये घबराट

महिला दरीत कोसळताच तिच्या बरोबर असलेल्या पतीने आरडाओरड केल्यानंतर तेथे असलेल्या पर्यटकांनी मदतीसाठी धावाधाव केली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT