‘अल्पवयीन मुलींना पाहून मी विचलित होतो..’ अन् वासनांध आरोपी जायचा मंदिरात!
Nagpur Crime News : महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी 6 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी पहिल्यांदा अल्पवयीन मुलींचा विनयभंग करायचा आणि नंतर मंदिरात जाऊन डोके आपटून पश्चाताप करायचा.
ADVERTISEMENT
Nagpur Crime News: नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अल्पवयीन मुलींचा विनयभंग (Molesting) केल्याप्रकरणी 6 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी पहिल्यांदा अल्पवयीन मुलींचा (Minor Girls) विनयभंग करायचा आणि नंतर मंदिरात जाऊन डोके आपटून पश्चाताप करायचा. या व्यक्तीवर विनयभंगाचे 6 हून अधिक गुन्हे दाखल असून तो POCSO कायद्यांतर्गत तुरुंगातही गेला आहे. (Nagpur Crime News Man arrested by Police for Molesting minor girls)
ADVERTISEMENT
ही घटना 3 ऑक्टोबर रोजी नागपुरातील धंतोली भागातील एका अपार्टमेंटमध्ये घडली होती. एक अल्पवयीन मुलगी बसमधून उतरली आणि अपार्टमेंटच्या दिशेने जात होती. ती आत जायला निघताच त्या माणसाने तिला थांबवले, कुरिअरवाला म्हणून ओळख करून दिली आणि बोलायला सुरुवात केली. संधी मिळताच त्याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. तिने आरडाओरडा केल्यावर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
Ncp Crises: शरद पवारांचे समर्थक ‘कलानी कुटुंब’ दादांच्या भेटीला; राजकारणात खळबळ
याबाबत पीडितेने तातडीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, त्या आधारे आरोपीची ओळख 32 वर्षीय शैलेश भोजराज यादव असे झाली.
आरोपीविरुद्ध विनयभंगाचे 6 गुन्हे दाखल
धंतोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी सांगितले की, शैलेश हा एक गुन्हेगार आहे. त्याच्यावर प्रतापनगर, सीताबारी, कोतवाली, गिट्टीखदान यासह नागपुरातील विविध पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शैलेशला प्रताप नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही 3 वर्षांची शिक्षा झाली असून, तो सध्या जामिनावर आहे.
Kalyan Crime : किरकोळ वाद अन् मित्रानेच चार्जरच्या वायरने गळा आवळून केला खेळ खल्लास!
‘अल्पवयीन मुलींना मन विचलित होतं’- आरोपी शैलेश
अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य केल्यानंतर आरोपी मंदिरात जाऊन देवासमोर पश्चाताप करतो असे, पोलीस चौकशीत समोर आले आहे. तो तिथे डोकं आपटतो. याबाबत आरोपी शैलेश म्हणाला की, ‘जेव्हा तो अल्पवयीन मुलींना पाहतो तेव्हा तो अस्वस्थ होतो आणि त्याचे मन विचलित होते. संधी मिळताच तो मुलींशी गैरवर्तन करतो.’
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT