Bandra मध्ये TC बनून 54 वर्षीय महिलेवर ट्रेनमध्ये बलात्कार, सुन्नं करणारं प्रकरण!
मुंबईतील अत्यंत परिचीत अशा वांद्रे स्थानकात एका 25 वर्षीय तरुणाने 54 वर्षीय महिलेवर रेल्वेमध्येच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वांद्रे स्थानकातील रेल्वेमध्ये 54 वर्षीय महिलेवर बलात्कार

टीसी असल्याचे भासवून महिलेवर केला वासनांधा तरूण अतिप्रसंग

स्टेशनवरच कुली काम करणाऱ्या आरोपीचं घृणास्पद कृत्य
Bandra Rape Case: छाया काविरे, मुंबई: एक 54 वर्षीय महिला हरिद्वारहून आपल्या जावयासोबत मुंबईत आली. मुंबईतल्या वांद्रे टर्मिनल्सवर ते दोघेही ट्रेनमधून उतरले. वेळ होती रात्रीची. त्यामुळे त्यांनी प्लॅटफॉर्मवरच थांबण्याचा निर्णय घेतला. महिलेचा जावई प्लॅटफॉर्मवरच झोपला. रात्रीचे 2 वाजले होते. उघड्या जागी महिलेला झोप येत नव्हती. म्हणून समोरच उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनच्या डब्यात ती झोपण्यासाठी चढली आणि घात झाला.
ती एकटी असल्याचं पाहून टीसी बनून एका 25 वर्षीय नराधम तरुणाने त्या 54 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. ही हादरवून टाकणारी घटना 1 फेब्रुवारीच्या रात्री घडली. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय? तो तरुण नेमका कोण होता? जाणून घेऊयात हे संपूर्ण.
हे ही वाचा>> पत्नीचे अश्लील फोटो काढले अन् मित्रालाच पाठवले, मित्राकडून महिलेकडे सेक्सची मागणी...
54 वर्षीय महिला वासनांध तरुणाच्या हाती कशी सापडली?
रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिला आणि तिचा जावई शनिवारी रात्री ट्रेनने वांद्रे टर्मिनसला पोहोचले. तिथे ट्रेनमधून उतरल्यानंतर, ती महिला झोपण्यासाठी दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली जी प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला उभी होती. त्यावेळी त्या ट्रेनमध्ये दुसरा कोणीही प्रवासी नव्हता. याचाच फायदा घेत संधी साधून एक तरुण तिथं पोहोचला.
महिलेला टीसी असल्याचं त्याने भासवलं. तिकीट कुठयं असं विचारल्यावर महिला भांबावून गेली. फाईन द्यावं लागेल असं सांगत त्या तरुणाने त्या महिलेला दुसऱ्या डब्यात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर कुणीही नव्हतं. त्यामुळे त्या महिलेचा आवाज कोणापर्यंत पोहचू शकला नाही.
हे ही वाचा>> शिर्डी हादरली, साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या CCTV मध्ये कैद!
धक्कादायक, म्हणजे पोलिसांच्या तपासात हे समोर आलं की तो तरुण म्हणजे त्या स्टेशनवर काम करणारा एक कुली होता. महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी कुली घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी कुलीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीला शोधण्यात पोलीसांना यश आलं.
याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. पोलिसांचे एक पथक आरोपी लपलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या वासनांध विकृतीला चिमुकल्यांपासून ज्येष्ठ महिलाही बळी पडताहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित होतात.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या म्हणजे एनसीआरबीच्या अहवालानुसार महिलांवर रोज सरासरी 87 लैंगिक अत्याचार होतात. दरवर्षी हे प्रमाण 7 टक्क्यांनी वाढते. गेल्या पाच वर्षांत आठ लाखांहून अधिक महिलांवर बलात्कार झाल्याची ही आकडेवारी दर्शवते.
राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही लैंगिक शोषण करण्याचं प्रमाण जास्त आहे.
गेल्या 5 वर्षांची जर ही आकडेवारी पाहिली तर 2019 मध्ये राज्यात 5412 बलात्कार झाले. 2020 मध्ये 4846, 2021 मध्ये 5954, 2022 मध्ये 7084 तर, 2023 मध्ये राज्यात 7521 बलात्कार झाले आहेत. एवढी प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला आहे. महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. हे केवळ नोंद झालेले गुन्हे आहेत. नोंद नसलेले गुन्हे अधिक असू शकतात.