Viral Video: पत्नी, मुलीशी बोलला अन्... इंजिनिअरने थेट अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

इंजिनिअरने थेट अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी
इंजिनिअरने थेट अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीतील इंजिनिअरची आत्महत्या

point

मुंबईतील अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी

point

इंजिनिअरच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय?

Atal Setu Suicide Video: मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या 38 वर्षीय इंजिनिअरने मुंबईतील अटल सेतू येथून थेट समुद्रात उडी मारल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन कुरूतुरी असं या उडी मारलेल्या इंजिनिअरचं नाव आहे. ही घटना काल (24 जुलै) दुपारी घडली आहे. ज्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. (mumbai after talking to his daughter and wife the engineer jumped into direct sea from atal setu video goes viral)

ADVERTISEMENT

दरम्यान अद्यापही श्रीनिवासन याचा मृतदेह सापडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक मच्छीमारांसह पोलीस हे श्रीनिवासन याचा शोध घेत आहेत. श्रीनिवास बुधवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. वाटेत त्याने पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीशी फोनवरुन बोलणंही केलं होतं. मात्र तो आत्महत्या करणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती.

हे ही वाचा>> Nagpur : दोघं OYO मध्ये गेले अन् नग्नावस्थेतच तो आला बाहेर, नागपुरात काय घडलं? 

श्रीनिवासन यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. 2023 मध्ये कुवेतमध्ये काम करत असताना त्याने फिनाइल पिऊन  आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, कालच्या घटनेनंतर श्रीनिवासच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्रीनिवासला शोधण्यासाठी मासेमारी नौका आणि सागरी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जात आहे. मात्र, खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! गर्भवती प्रेयसीचा मृत्यू, नंतर दोन मुलांना जिवंत फेकलं नदीत

अटल पुलावरून मारली थेट खोल समुद्रात उडी 

दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे, सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, श्रीनिवास आपल्या टाटा नेक्सॉन कारमधून अटल सेतूवर येतो आणि पुलाच्या रेलिंगवर चढून थेट खोल समुद्रात उडी मारतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन कुरुतुरी हा डोंबिवली येथील रहिवासी होता. तो 8 महिन्यांपूर्वी कुवेतहून घरी आला होता. त्याने मुंबईत व्यवसाय सुरू केला होता.

अद्यापही सापडला नाही मृतदेह

पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे शोध मोहिमेत अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 20 मार्च रोजी एका महिला डॉक्टरने येथून उडी मारून आत्महत्या केली होती.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT