Nagpur Crime : संशयाच भूत डोक्यात शिरलं, लोखंडी रॉडने पत्नीला संपवलं; नेमकं काय घडलं?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

nagpur crime news husband killed his wife  Suspicion of an immoral relationship shockinh crime story
नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या दीक्षित नगरमध्ये ही घटना घडली आहे.
social share
google news

Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने लोखंडी रॉडने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. चारित्र्यांच्या संशयातून ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पती  दिलप्रीत सिंह उर्फ विक्की याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (nagpur crime news husband killed his wife  Suspicion of an immoral relationship shockinh crime story) 

नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या दीक्षित नगरमध्ये ही घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव मन्नत कौर (24 वय) आहे. दिलप्रीत सिंहने 5 वर्षापू्वीच मन्नत सोबत लव्ह मॅरिज केले होते. या लग्नापासून त्यांना 2 वर्षाच्या मुलगा देखील आहे. खरं तर या लग्नापासून दिलप्रीत सिंहचे कुटुंबिय नाराज होते. यातूनच त्यांच्या कुटुंबियात सतत भांडणे व्हायची. 

दिलप्रीत सिंहचे कपिल नगर चौक परिसरात किंग्ज एसेसीरीज नावाचे कार डेकोरेशनचे दुकान  आहे. त्याला दारू पिण्याचे देखील व्यसन होते. आणि तो कर्जात देखील बुडाला होता. या दरम्यान दिलप्रीतला मनप्रीत कौरच जीम ट्रेनरसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. या संशयातून नवरा बायकोमध्ये जोरदार भांडणे व्हायला सुरूवात झाली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra Politics : 'माझी लाडकी बहीण' महायुतीला तारणार? समजून घ्या राजकीय अर्थ

या भांडणानंतर मनप्रीत कौर तलाक देण्याच्या इराद्याने माहेरी निघून जाते. मात्र दिलप्रीत सिंहच्या सांगण्यावरून ती काही दिवसांसाठी एका फ्लॅटमध्ये राहायला सुरूवात करते. या दरम्यान पुन्हा एकदा नवरा बायकोमध्ये भांडण होते. या भांडणात दिलप्रीत कौर लोखंडी रॉडने मनप्रीत हल्ला करून तिची हत्या करतो.

 या घटनेनंतर दिलप्रीत कौर घटना स्थळावरून फरार होतो. मन्नतचे कुटुंबीय तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीय मन्नतच्या घरी पोहोचते, तेव्हा मन्नत कौर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. हा संपूर्ण प्रकार पाहून कुटुंबियांना धक्काच बसतो. 
 
मन्नतचे कुटुंबिय पोलिसांना या घटनेची माहिती देते. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाच पोस्टमॉर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवतात. त्यानंतर कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिस आरोपी दिलप्रीत सिंग उर्फ ​​विक्कीला शोधून काढत त्याला अटक करतात. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : विधानसभा निवडणुकीआधी थेट कृषी पंपाचं वीज बीलच माफ!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT