गुप्तांगाला लटकवले डंबेल, तोंडात कोंबलं मलम अन्... कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत हादरवून टाकणारं रॅगिंग

मुंबई तक

केरळमधील एका कॉलेजमध्ये अत्यंत हादरवून टाकणारी घटना घडली आहे. जिथे काही सीनिअर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युनिअर विद्यार्थ्यांसोबत अमानुष प्रकारचं रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ADVERTISEMENT

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत हादरवून टाकणारं रॅगिग (फोटो सौजन्य: AI)
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत हादरवून टाकणारं रॅगिग (फोटो सौजन्य: AI)
social share
google news

Kottayam Nursing College Ragging Case: केरळमधून रॅगिंगची एक अशी भयानक घटना समोर आली आहे की, ज्याने प्रत्येक व्यक्ती हादरून जाईल. येथे तीन विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या सीनियर विद्यार्थ्यांनी असे काही क्रूर कृत्य केले की ज्यामुळे सर्वांनाच प्रचंड मोठा धक्का बसला आहे. (they tied dumbbells on their private parts and injured them with a compass this act of ragging students of kerala nursing college will shock you)

नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग

कोट्टायमच्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जिथे एका नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला. खरंतर, काही सीनियर विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांच्या ज्युनियर विद्यार्थ्यांचे कपडे काढले. मग व्यायामासाठी वापरले जाणारे जड डम्बेल त्यांच्या गुप्तांगाला टांगण्यात आले. या भयंकर कृत्यामुळे पीडित विद्यार्थ्यांना वेदना होऊ लागल्या आणि ते दयेची याचना करू लागले. पण त्यांचे रॅगिंग करणाऱ्यांना याचे काहीही वाटले नाही. अत्यंत निर्दयीपणे त्यांनी ही रॅगिंग सुरूच ठेवली.

हे ही वाचाKolhapur Crime: भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने जेवणात कालवलं विष अन्... असं केलं तरी का?

गुप्तांगाला बांधले डम्बेल

रॅगिग करणारे नराधम इथवरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित मुलांना कंपास आणि धारदार वस्तूंनी मारहाण करून जखमी केले. जेव्हा पीडित मुलांनी वेदनेने ओरडायला सुरुवात केली तेव्हा सीनियर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जखमांवर आणि तोंडावर जबरदस्तीने मलम लावले. दरम्यान, या सगळ्या घटनेमनंतर अत्यंत मोठ्या कष्टाने पीडित विद्यार्थी हे तेथून बाहेर पडले. पण त्यांची ही भयंकर अवस्था पाहून इतर सर्व विद्यार्थी अक्षरश: हादरून गेले.

हे ही वाचाMumbai Crime News : 20 वर्षीय महिलेवर अत्याचार, स्टेशनवर बेशुद्धावस्थेत आढळली महिला, नराधम रिक्षा चालक?

तीन विद्यार्थ्यांनी घेतली पोलिसात धाव

यानंतर, तीन पीडित विद्यार्थ्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि रॅगिंगला बळी पडलेल्या तीन ज्युनियर विद्यार्थ्यांनी शहरातील गांधीनगर पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तीन आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पाच आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध FIR

पोलिसांच्या कारवाईनंतर कॉलेज प्रशासनही जागे झाले. त्यामुळे कोट्टायम कॉलेजने या लज्जास्पद घटनेत सहभागी असलेल्या पाचही आरोपी विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपी विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना कंपासने जखमी केले आहे. कॉलेजचे प्राचार्य म्हणतात की, या प्रकरणात अँटी रॅगिंग कायद्यांतर्गत चौकशी करण्यात आली आहे.

पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबाने दिली माहिती

रॅगिंगच्या घटनेबद्दल विद्यार्थ्यांनी काहीही सांगितले नाही, असे कार्यवाहक प्राचार्य डॉ. लिनी जोसेफ यांनी सांगितले. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी वर्गशिक्षकांना फोन करून याबद्दल माहिती दिली. तक्रार मिळाल्यानंतर, प्राथमिक तपासणी करण्यात आली आणि कारवाई करण्यात आली. सखोल चौकशीसाठी एक समिती स्थापन केली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp