पाच अफेअर्सनंतर सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न, कोण आहे ‘हा’ 57 वर्षीय अभिनेता?
मिलिंद सोमण याने 5 अफेअर्सनंतर त्याच्या सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न केले होते. वयाने तब्बल 25 वर्ष लहान असलेल्या तरूणीसोबत मिलिंद सोमणने लग्न केले. या लग्नाची त्यावेळेस खुप चर्चा रंगली होती.
ADVERTISEMENT
प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि आर्यनमॅन अशी ओळख असलेला अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते. जितकी चर्चा त्याच्या फिटनेसची होत असते तितकीच चर्चा त्याच्या अफेअर्सची देखील होत असते. मिलिंद सोमण याने 5 अफेअर्सनंतर त्याच्या सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न केले होते. वयाने तब्बल 25 वर्ष लहान असलेल्या तरूणीसोबत मिलिंद सोमणने लग्न केले. या लग्नाची त्यावेळेस खुप चर्चा रंगली होती. दरम्यान आता मिलिंद सोमण यांच्या आयुष्यात आलेल्या त्या अभिनेत्री आणि मॉडेल्सबद्दल जाणून घेऊयात. (milind soman five affairs married with sixth girl friend ankita konwar)
ADVERTISEMENT
मधू सप्रे : अभिनेता मिलिंद सोमणचे पहिले रिलेशनशीप मधू सप्रे सोबत होते. मधू सप्रे हि 1992 सालच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत दुसरी रनर अप ठरली होती. त्याकाळी दोघेही मुंबईत लिव्ह इनमध्ये राहत होते.अनेक प्रोजेक्टसमध्ये देखील मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांनी काम केले होते. दरम्यान एका फॅशेन कॅम्पेशनसाठी दोघांनी न्यूड पोज दिल्या होत्या, यावरून नंतर मोठा वादही झाला होता. तीन वर्षाच्या यशस्वी नात्यानंतर 1995 साली त्यांनी एकमेकांसोबत ब्रेकअप केले होते.
दीपानीता शर्मा : मधू सप्रेनंतर मिलिंद सोमण याच्या आयुष्यात दीपानीता शर्मा आली होती. जोडी ब्रेकर्स चित्रपटात दोघांची ओळख झाली होती. या चित्रपटातील दोघांची केमेस्ट्री पाहून त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 2000 सालची ही घटना आहे.यामध्ये दोघेही लिव्ह इनमध्ये राहत असल्याची चर्चा होती, पण दोघांनी कधीही त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Baipan Bhari Deva : हिरो नसलेला मराठी सिनेमा बॉलिवूडला भिडला; कमावले…
गुल पनाग : अभिनेता मिलिंद सोमण गुल पनाग सोबत देखील नात्यात होता. जुर्म चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. 2005 साली या चित्रपटात काम करताना दोघे एकमेकांना डेट करू लागले होते. त्यावेळी दोघांना इंडस्ट्रीत या दोघांना ‘ओपन सीक्रेट’ म्हटलं जायचं.
मायलिन झाम्पानोईशी पहिलं लग्न : गुल पनाग नंतर मिलिंद सोमण मायलिन झाम्पानोईशी सोबत नात्यात होता. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर 2006 साली त्यांनी लग्न केले होते. मिलिंद सोमणचे हे पहिलेचे लग्न होते आणि ते फार काळ टीकले नाही. अवघ्या तीन वर्षानंतर 2009 साली मायलिन झाम्पानोईशी सोबत त्याने घटस्फोट घेतला.
ADVERTISEMENT
शहाना गोस्वामी : मिलिंद सोमणचे पहिले लग्न तुटल्यानंतर त्याच्या आयुष्यात 2010 साली शहाना गोस्वामी आली होती. शहाना आणि मिलिंदमध्ये तब्बल 21 वर्षाचे अंतर होते. मिलिंदने हे नाते स्विकारले होते. दोघेही अनेकदा मॅगझीनच्या कव्हरपेजवर आणि इव्हेंट्समध्ये एकत्र दिसले होते. तब्बल तीन वर्ष नात्यात राहिल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केला होता.
ADVERTISEMENT
25 वर्ष लहान तरूणीसोबत लग्न : साधारण पाच अफेअर्सनंतर मिलिंद सोमण सहाव्यांदा अंकिता कोंवरसोबत नात्यात आला होता. त्या दोघांचे एकत्रित फोटो पाहून त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा नेहमीच रंगत असायच्या. दरम्यान अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2018 साली लग्नगाठ बांधली होती. दोघांमध्ये साधारण 25 वर्षाचे अंतर होते. वयाच्या अंतरावरून दोघांना ट्रोल देखील करण्यात आले होते. त्याच्या लग्नाला आता सहा वर्ष पुर्ण झाली आहेत. आणि त्याचा सुखी संसार सुरू आहे.
हे ही वाचा : OMG 2 : ‘रख विश्वास तू है शिव का दास!’ अक्षय कुमार जबरदस्त लुक, टीजर बघितलात का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT