Ladki Bahin Yojana : तुमचा अर्ज DRAFT मध्ये अडकलाय...वेबसाईटवर कसा करायचा सबमिट?
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज सबमिट झाले आहेत, ते अर्ज छाननी नंतर मंजूर होणार आहेत. काहींचे मंजूरही झाले असतील. तर काही महिलांचे अर्ज हे ड्राफ्टमध्येच अडकून पडले आहेत. संपूर्ण माहिती भरून सुद्धा हे अर्ज सबमिट होत नाही आहेत. त्यामुळे महिलांसमोर हे अर्ज सबमिट करण्याचे मोठं आव्हान निर्माण झालंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तुमचा अर्ज ड्राफ्टमध्ये अडकला आहे?
अर्ज सबमिट करून कसा मंजूर करायचा?
'या' सोप्प्या ट्रिकने अर्ज सबमिट करता येणार?
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी अनेक महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी आहे. काहींचे अर्ज हे सबमिट (Application Submit) झाले आहेत. तर काहींचे अर्ज हे ड्राफ्टमध्येच (Draft) अडकून पडले आहेत. त्यामुळे ड्राफ्टमध्ये अडकले अर्ज कसे सबमिट करायचे? व हे अर्ज कसे मंजूर होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana women application stuck in draft how to submit and approve application mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde read full story)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज सबमिट झाले आहेत, ते अर्ज छाननी नंतर मंजूर होणार आहेत. काहींचे मंजूरही झाले असतील. तर काही महिलांचे अर्ज हे ड्राफ्टमध्येच अडकून पडले आहेत. संपूर्ण माहिती भरून सुद्धा हे अर्ज सबमिट होत नाही आहेत. त्यामुळे महिलांसमोर हे अर्ज सबमिट करण्याचे मोठं आव्हान निर्माण झालंय. मात्र महिलांची चिंता करण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज 'या' पद्धतीत मंजूर करता येईल.
हे ही वाचा : Badlapur: 'तो एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखा...', अक्षय शिंदेंच्या पहिल्या पत्नीनं सांगितलं भीषण सत्य
ड्राफ्टमध्ये अर्ज अडकल्यावर काय करायचं?
तुम्ही अर्ज भरून झाल्यावर, जर तुमचा अर्ज ड्राफ्टमध्ये दाखवत असेल तर पहिला पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्जात दुरूस्ती करण्याची संधी मिळते. दुरूस्ती केल्यावर तुम्ही खाली दिलेल्या सेव्ह अॅस ड्राफ्टवर क्लिक करतो. जेणेकरून आपण दिलेली माहिती पुन्हा ड्राफ्टमध्ये सेव्ह करतो.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
खरं तर इथेच आपल्याकडून चूक घडते. कारण ड्राफ्टमधल्या अर्जात दुरूस्ती केल्यानंतर आपण संपूर्ण माहिती सेव्ह करण्यासाठी सेव्ह अॅस ड्राफ्टवर क्लिक करतो. पण असे केल्यामुळे फक्त वेबसाईटवर तुमची माहिती सेव्ह होत आहे. ती सबमिट होत नाही. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सेव्ह इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचे आहे. तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा अर्ज थेट सबमिट होणार आहे.
अर्ज सबमिट झाल्यावर तुमच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीत जर सगळ्या गोष्टी योग्य असल्या तर तुमचा अर्ज हा मंजूर होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे तुम्हाला ड्राफ्टमध्ये अर्ज सबमिट करून मंजूर करता येणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Tanaji Sawant : ''आम्ही उडत्याचे मोजतो'', मंत्री तानाजी सावंतांची शेतकऱ्यासमोर मुजोर भाषा
'या' तारखेला पैसे खात्यात येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT