ladki Bahin Yojana: कामाठीपुरात बांगलादेशी महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ! पोलिसांनी टाकली धाड अन् घडलं...

मुंबई तक

ladki Bahin Yojana Latest News: बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात बांगलादेशी नागरिकाला पुणे पोलिसांनी अटक केली होती.

ADVERTISEMENT

Ladki Bahin Yojana Latest News
Ladki Bahin Yojana Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बांगलादेशी महिलेचं बिंग फुटलं

point

कामाठीपुरात पोलिसांनी केली धडक कारवाई

point

महिलेसह 5 बांगलादेशी नागरिक आणि एक दलाल अटकेत

ladki Bahin Yojana Latest News: बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात बांगलादेशी नागरिकाला पुणे पोलिसांनी अटक केली होती. अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबई पोलिसांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेसह 5 बांगलादेशी नागरिकांना आणि एका दलालला अटक केली आहे. दक्षिण मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.

धक्कादायक प्रकरण आलं समोर

मुंबईत एका कथित बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात राहणाऱ्या या बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि सरकारच्या माध्यमातून या महिलेला योजनेचा लाभ मिळाला. मुंबईच्या पोलिसांच्या कारवाईत ही धक्कादायक माहिती उघड झाली.

हे ही वाचा >>  Balasaheb Thackeray: 'हिंदूंसाठी बाळासाहेब देवासारखे! 26 जानेवारीला भारतरत्नची घोषणा करा...', ठाकरे सेनेची PM मोदींकडे मागणी

या प्रकरणाची होतेय कसून चौकशी

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेसह 5 बांगलादेशी नागरिकांना आणि एका दलालला अटक केली आहे. दक्षिण मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या घटनेमुळं लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित केला जात आहे.

पुण्यात अटक करण्यात आलेला बांगलादेशी आरोपी मागील पाच वर्षांपासून भारतात राहत होता. त्याने बेकायदेशीरपणे भारत-बांगलादेश सीम पार केली होती आणि कोलकातामध्ये जन्मदाखला बनवला होता. त्यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबईहून पुण्यात पोहोचला होता. मुंबई, ठाणे आणि भिवंडीतही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचं समोर आलं होतं. या आरोपींकडे भारतीय आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्टसारखे डोक्युमेंट मिळाले होते.

हे ही वाचा >>  Pimpri Chinchwad Crime News : लिफ्टमधल्या रक्ताच्या डागांमुळे हत्येचा कट उघड, प्रेयसीनेच केला घात

"माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकही लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यात आलेले नाहीत. ज्या महिला अपात्र आहेत त्या स्वेच्छेने योजनांचा लाभ सोडतायत. अशा साडेचार हजार महिला असतील. प्रत्येक योजनांची वर्षभरात स्क्रुटिनी होते. माझी लाडकी बहीण त्याला अपवाद नाही. योजनांमधल्या त्रुटी शोधण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. त्यामानानं आमची योजना नवीन आहे त्यामुळे अशा त्रुटी समोर येतील तशी दुरूस्ती होत राहील, अशी मोठी प्रतिक्रिया महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना दिली होती.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp