Maharashtra Vidhan Sabha: अजित पवार-अमित शाहांची मध्यरात्री बैठक, हव्यात 'इतक्या' जागा?
Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी 24 जुलै च्या मध्यरात्री दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवार-अमित शाहांची दिल्लीत बैठक
अजित पवारांना विधानसभेला किती जागा हव्यात?
जागावाटपाबद्दल अमित शाह-अजित पवारांची चर्चा
Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मध्यरात्री झालेल्या या भेटीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (Ajit Pawar has laid claim over nearly 80 to 90 seats as promised during joining the Mahayuti.)
ADVERTISEMENT
अजित पवार मध्यरात्री दिल्लीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे अचानक मध्यरात्री 1 वाजता दिल्लीत गेले. सकाळी 8 वाजेपर्यंत ते दिल्लीत होते. यावेळेत त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली.
अमित शाहांची अजित पवारांनी का घेतली भेट?
सूत्रांनी 'मुंबई Tak'ला दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली. महायुतीमध्ये सहभागी होताना अजित पवारांना 80 ते 90जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तितक्या जागांवर अजित पवारांकडून दावा करण्यात आला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "...म्हणून मी गुलाबी जॅकेट घालायला लागलो", अजित पवारांनी सांगितलं कारण
लोकसभेप्रमाणे शेवटपर्यंत जागावाटपाची चर्चा रेंगाळत न ठेवता विधानसभा निवडणुकीसाठी लवकरात लवकर जागावाटप करण्यात यावे, असा मुद्दा अजित पवारांनी मांडला.
अजित पवारांना किती जागा हव्यात?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या विधानसभेवेळी जिंकलेल्या 54 जागा मागितल्या आहेत. त्याचबरोबर अजित पवारांची काँग्रेसविरोधातील 20 जागांवर नजर आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा संतापले
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 20 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हव्या आहेत.
ADVERTISEMENT
अजित पवारांना हव्या मुंबईतील 4 ते 5 जागा
सूत्रांनी सांगितले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 ते 5 जागा मुंबईतील हव्यात आहेत. या जागा काँग्रेसविरोधातील आणि अल्पसंख्यांक व्होट बँक असलेल्या आहेत.
ADVERTISEMENT