Shiv Sena (Shinde) Candidates List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर.. कोणाला दिला धक्का?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates: शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर
Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates: शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CM शिंदेंनी जाहीर केले त्यांचे उमेदवार

point

विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा?

point

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (Shinde group) 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मध्ये ज्या पक्षाच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं त्या पक्षाने आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. सत्ताधारी शिवसेने आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत शिंदेंनी 45 उमेदवारांना तिकीट दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीपासून महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचं वजन बरंच वाढलं आहे. भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा चांगला असल्याने आता त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढली आहे. जे या पहिल्या यादीतून देखील पाहायला मिळत आहे. 

महायुतीमध्ये भाजप जरी सर्वाधिक जागा लढविणार असलं तरी शिवसेनेला देखील अधिक जागा मिळाव्या असा आग्रह शिवसेनेचा होता. अखेर आज पहिली यादी जाहीर करत त्यापैकी काही जागा शिंदेंना आपल्या पदरात पाडून घेण्यात यश आल्याचं दिसतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024: Raj Thackeray : राज काकांचा आता पुतण्याविरोधात उमेदवार, आदित्य ठाकरेंना 'हा' मनसैनिक भिडणार!

ठाकरेंना थेट भिडणारे एकनाथ शिंदे हे सध्या बरेच चर्चेत आहे. मुख्यमंत्री पद आल्यापासून शिंदेंनी आपल्या कामाची पद्धत आणखी बदलत त्यात आक्रमकता आणल्याचं दिसतं आहे. ज्याचा त्यांना पक्षाच्या पातळीवर फायदाही होताना दिसत आहे. मात्र, असं असलं तरीही सहानुभूतीचा मोठा फायदा हा ठाकरेंना होत असल्याने शिंदे हे चांगलेच अर्लट आहेत.  

पाहा शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (Shinde) 1st Candidates List)

 

 

 

शिवसेना (शिंदे गट) पक्षाची यादी जाहीर 

1. कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
2. साक्री - मंजुळाताई गावित
3. चोपडा - चंद्रकांत सोनावणे
4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
5. एरंडोल - अमोल चिमणराव पाटील
6. पाचोरा - किशोर पाटील
7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
8. बुलढाणा - संजय गायकवाड
9. मेहकर - संजय रायमुलकर
10. दर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळ
11. रामटेक - आशिष जैस्वाल
12. भंडारा - नरेंद्र भोंडेकर
13. दिग्रस - संजय राठोड
14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
15. कळमनुरी - संतोष बांगर
16. जालना - अर्जुन खोतकर
17. सिल्लोड - अब्दुल सत्तार
18. छ. संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल 
19. छ. सभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाट
20. पैठण - विलास संदीपान भूमरे 
21. वैजापूर - रमेश बोरनारे
22. नांदगाव - सुहास कांदे 
23. मालेगाव बाह्य - दादाजी भुसे
24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक
25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे
26. जोगेश्वरी पूर्व - मनिषा रवींद्र वायकर
27. चांदिवली - दिलीप लांडे
28. कुर्ला - मंगेश कुडाळकर
29. माहीम - सदा सरवणकर
30. भायखळा - यामिनी जाधव
31. कर्जत - महेंद्र थोरवे
32. अलिबाग - महेंद्र दळवी
33. महाड - भरतशेठ गोगावले
34. उमरगा - ज्ञानराज चौगुले
35. परांडा - तानाजी सावंत
36. सांगोला - शहाजीबापू पाटील
37. कोरेगाव - महेश शिंदे
38. पाटण - शंभूराज देसाई
39. दापोली - योगेश कदम
40. रत्नागिरी - उदय सामंत
41. राजापूर - किरण सामंत 
42. सावंतवाडी - दीपक केसरकर
43. राधानगरी - प्रकाश आबिटकर 
44. करवीर - चंद्रदीप नरके
45. खानापूर - सुहास बाबर

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतील सर्वात मोठं बंड 

शिवसेनेने आतापर्यंत अनेक बंड पाहिली होती. मात्र, 2022 साली एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने बंड केलं ते शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड ठरलं. आपल्या पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत स्वत: त्या पदावर जाण्याची किमया एकनाथ शिंदेंनी करून दाखवली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024: Raj Thackeray MNS Candidate List: अमित ठाकरेंना तिकीट जाहीर, राज ठाकरेंकडून मनसेची यादी जाहीर

भाजपच्या साथीने सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी बंडानंतर अत्यंत आक्रमकपणे ठाकरेंना अंगावर घेतलं. प्रत्येक पातळीवर ठाकरेंना भिडण्यास त्यांनी सुरुवात केली. एवढंच नव्हे तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील मिळविण्यात ते यशस्वी ठरले. 

40 आमदारांचा पाठिंबा अन् मुख्यमंत्री पद 

एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला काही मोजक्या आमदारांसह शिवसेनेत बंड करत सुरत गाठलं होतं. पण तिथून गुवाहटीला पोहचल्यानंतर त्यांच्या आमदारांची संख्या ही जवळजवळ 40 पर्यंत पोहचली. या सगळ्या दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या चर्चेनुसार शिंदेंना थेट महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद देण्यात आलं. 

भाजपच्या 105 आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी आपलं सरकार बनवलं. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आलं.  

या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे पाहता शिवसेना शिंदे गटाला आता विधानसभा निवडणुकीत आपली कामगिरी चांगली राहील अशी आशा आहे. पण राज्यातील जनता नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT