Adar Poonawalla : "चप्पलपेक्षाही लस स्वस्त, किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य हवं...", दावोसमध्ये पुनावालांकडून खदखद?

मुंबई तक

आदर पूनावाला म्हणाले, भारतात बनत असलेल्या लसींची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य कंपनीला असलं पाहिजे. लसीची किंमत आणि इतर गोष्टी उद्योगांसोबतच्या बैठकीत ठरवल्या पाहिजेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लसींच्या किमतीबद्दल बोलताना पुनावालांनी खदखद व्यक्त केली?

point

'बिझनेस टूडे'शी बोलताना काय म्हणाले आदर पुनावाला?

point

लसींच्या किंमती ठरवण्याचं हवं स्वातंत्र्य

Adar Poonawalla on Vaccine Price : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी लस आणि लसींच्या किंमतीबद्दल एक महत्वाचं विधान केलं आहे. "आम्हाला आमच्या उत्पादनांची योग्य किंमत ठरवण्याचा अधिकार दिला पाहिजे," असं मत आदर पूनावाला यांनी बिझनेस टुडेचे कार्यकारी संचालक राहुल कंवल यांच्याशी बोलताना व्यक्त केलं. लस क्षेत्राला जाहिराती किंवा सवलतींची गरज नाही, पण किंमतींच्या नियंत्रणातून दिलासा द्यायला हवा असं पुनावाला यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Walmik Karad CCTV Video : खंडणी मागितली त्यादिवशी सगळे आरोपी एकत्र? CCTV ने उडवली खळबळ

पूनावाला म्हणाले की, "काही लसी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या बूट किंवा चप्पलपेक्षाही कमी किमतीत विकल्या जातात. आपण लस 100 किंवा 200 रुपयांना विकतोय, पण जर कोणी ती 300 किंवा 400 रुपयांना विकत असेल तर ते चुकीचं नाही. व्यवसायावरील वाढत्या आर्थिक दबावाबाबत, पूनावाला म्हणाले, लसीची किंमत सल्लामसलत न करता कमी केली जातेय, किमती वाढवल्या जात नाहीयेत."

लस निर्मिती क्षेत्रातील आव्हानं...

आदर पूनावाला यांनी लस उद्योगाची तुलना आयटी, ऑटो आणि फायनान्स सारख्या भरभराटीच्या क्षेत्रांशी केली आणि या क्षेत्रातले आव्हानं सांगितले. ते म्हणाले, 'आयटी उद्योग दर तीन महिन्यात 1 अब्ज रुपये कमावतो. पण लस उद्योग वर्षालाही 1 अब्ज रुपये कमवू शकत नाही.” हे उदाहरण देत पूनावाला यांनी खदखद व्यक्त केली. उत्पादकांकडे संशोधनात गुंतवणूक करण्यासाठी किंवा नोकऱ्या निर्माण करण्यासाठी भांडवलाची कमतरता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा >> Saif Ali Khan Discharge : सैफ अली खान घरी पोहोचला, गाडीतून उतरून रूबाबात चालत गेला

आदर पूनावाला म्हणाले, भारतात बनत असलेल्या लसींची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य कंपनीला असलं पाहिजे. लसीची किंमत आणि इतर गोष्टी उद्योगांसोबतच्या बैठकीत ठरवल्या पाहिजेत. पूनावाला  असंही म्हणाले की,गुंतवणूक केल्याशिवाय उद्योग यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे यानंतरच्या काळात लागणाऱ्य लसी विकसित करता येणार नाही.

पूनावाला यांनी सांगितलं की, 'जर तुम्हाला भारताला फायझर किंवा जीएसके सारख्या जागतिक दिग्गज कंपन्यांचं उत्पादन करताना पहायचं असेल, तर तशी संधी असायलाच हवी.' या कंपन्यांची किंमत 100-200 अब्ज डॉलर्स आहे, पण आपल्याला 1 अब्ज डॉलर्स ओलांडण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय.

हे वाचलं का?

    follow whatsapp