‘मतांच्या राजकारणासाठी एका संताचा…’, जितेंद्र आव्हाड शिंदे-फडणवीसांवर बरसले

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ncp mla jitendra awhad tweet on 12 dead in maharashtra bhushan event, hit out cm eknath shinde and devendra fadnavis
ncp mla jitendra awhad tweet on 12 dead in maharashtra bhushan event, hit out cm eknath shinde and devendra fadnavis
social share
google news

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी 12 श्री सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी अनेकजण उपचाराधीन असून, या दुर्दैवी घटनेची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे 12 जणांना उष्माघात झाल्याने शिंदे-फडणवीस सरकार टीकेचे धनी ठरत आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. आव्हाड म्हणतात, “काल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले.”

हेही वाचा >> ‘आमच्या पोटात काही नव्हतं’; जखमींनी अजित पवार, उद्धव ठाकरेंना काय सांगितलं?

“खरतरं ‘भारतरत्न’सारखा पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जातो. पण, संपूर्ण जगभर त्याचे प्रक्षेपण केले जाते. हा कार्यक्रम देखील त्यापद्धतीने करता आला असता. ह्या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असं दाखवायचं हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होतं”, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

“स्वत: सरकारतर्फे आव्हान केले जाते की, काम नसेल तर उन्हामध्ये जाऊ नका आणि इथे मात्र सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावलं होतं. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही. प्रचंड ऊन. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते. त्यामुळे आता भाविकांच्या मनात प्रचंड राग आहे”, असा मुद्दा जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते? आव्हाडांनी काय म्हटलंय?

“मतांच्या राजकारणासाठी एका संताचा वापर होऊन त्या संतांच्या भाविकांचा मृत्यू होणे, हे त्या संतांना मानणाऱ्या कुटुंबापैकी कोणालाच आवडणारे नाही. किंबहुना माझे तर असे मत आहे की, हे संतांनाही आवडलं नसेल. त्या वादात मला पडायचं नाही. पण, ह्या मृत्यूची जबाबदारी कोणालातरी घ्यावीच लागेल. जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते? हा कार्यक्रम संध्याकाळी देखील घेता आला असता. भरदुपारी सूर्य माथ्यावर असताना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती?”, असा सवाल करत आव्हाडांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राजकारणातील मतं वाढवण्याचा कार्यक्रम,… आव्हाडांनी केला तिखट सवाल

“संतांचा आणि धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. आणि नंतर मतं आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे…. यापुढे देखील येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची?”, असा तिखट सवाल जितेंद्र आव्हाड यांनी 12 जणांच्या मृत्यूवरून केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT