Appasaheb Dharmadhikari: 12 श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात राज ठाकरेंनी शिंदे सरकारला दिली क्लीन चीट, Tweet मध्ये काय?
Raj Thackeray: 12 श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात राज ठाकरेंनी ट्विट करून शिंदे सरकारला एक प्रकारे क्लीन चीटच देऊन टाकली आहे. पाहा राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे काल (16 एप्रिल) पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) सोहळ्याला 12 श्री सदस्याच्या झालेल्या मृत्यूने गालबोट लागलं आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Aapasaheb Dharmadhikari) यांना या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण याच कार्यक्रमात 100 हून अधिक श्री सदस्यांना उष्माघाताचा प्रचंड त्रास झाला. ज्यापैकी 12 जणांनी आपला प्राण गमावला आहे. तर इतरांवर उपचार सुरू आहेत. अशावेळी आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. मात्र, अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या दुर्घटनेसाठी शिंदे सरकारला जबाबदार न धरता त्याचं खापर हे प्रशासनावर फोडलं आहे. (12 people death in maharashtra bhushan event raj thackeray gave a clean chit to shinde government in)
ADVERTISEMENT
‘कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?’ असं म्हणत या सगळ्या दुर्घटनेला जबाबदारे प्रशासनच आहे. असं थेट राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अधिक वाचा- आप्पासाहेबांच्या बंगल्याबाहेरची रांगोळी पुसली, रोषणाई उतरवली.. रेवदंड्यात काय स्थिती?
राज ठाकरेंनी प्रशासनाला धरलं जबाबदार, पाहा ट्विटमध्ये काय म्हटलं:
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
ADVERTISEMENT
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2023
ADVERTISEMENT
अधिक वाचा- महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर ‘शोककळा’ : मृत्यू झालेले 11 श्री सदस्य कोण?
नेमकी घटना काय?
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Aapasaheb Dharmadhikari) यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या 12 श्रीसदस्यांचा रणरणत्या उन्हात उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर 24 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 25 जणांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती आहे.
रविवारी नवी मुंबईजवळील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 25 लाख श्रीसदस्यांनी उपस्थिती लावली होती.
अधिक वाचा- महाराष्ट्र भूषण : सरकार की धर्माधिकारी, कार्यक्रमाची वेळ कुणी ठरवली?
या सोहळ्यासाठी कालपासूनच जागा मिळविण्यासाठी अनेक श्रीसदस्य उपस्थित होते. तर अनेक श्रीसदस्य रविवारी पहाटे पोहचले होते. यावेळी रणरणत्या उन्हामुळे अनेक श्रीसदस्यांना त्रास जाणवू लागला. यातील 12 श्रीसदस्यांना उष्माघाताने आपला जीव गमवावा लागला.
ADVERTISEMENT