Tamil Selvan : भाजपच्या मुंबईतील आमदाराला तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bjp mla tamil selvan gets 6 months jail and assult bmc team mumbai story
bjp mla tamil selvan gets 6 months jail and assult bmc team mumbai story
social share
google news

Bjp Mla Tamil Selvan Sentenced of Six Month Jail : मुंबईतील भाजपचे सायन-कोळीवाड्याचे आमदार कॅप्टन आर तमिळ सेल्वन (Tamil Selvan)  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण कॅप्टन तमिळ सेल्वन यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. तमिळ सेल्वन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची (Six Month Jail) शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतकचं नाही तर प्रत्येकी 13 हजार 500 रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे? आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (bjp mla tamil selvan gets 6 months jail and assult bmc team mumbai story)

ADVERTISEMENT

सायन कोळीवाडा परिसरात निर्वासितांसाठी 25 इमारती बांधल्या गेल्या होत्या. या 25 इमारतीची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे 2017 ला महापालिका कर्मचाऱ्यांचे (BMC Team) पथक तेथील पंजाबी कॉलनीच्या तपासणीसाठी आले होते. त्यावेळी महापालिकेच्या पथकाने काही बेकायदेशीर वीज व पाण्याचे कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनंतर तमिळ सेल्वन यांच्यासह त्यांच्या इतर साथिदारांनी पालिकेच्या पथकाला धमकी देत मारहाण केली होती.

हे ही वाचा : Maratha Reservation : ठाकरे सरकारवर प्रचंड भडकले, ‘राजीनामा का देता,सत्तेत बसून प्रश्न सोडवा’

या घटनेनंतर कॅप्टन सेल्वन, माजी नगरसेवक जसबिरसिंग बिरा,इंद्रपालसिंग मारवा, दर्शनबीर सिंग कोच्छर, गजानन पाटील याच्यावर मारहानीचा आरोप झाला आणि हे प्रकरण पुढे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे खटला चालला. सरकारी पक्षातर्फे अॅड सुमेश पांजवांनी यांनी सादर केलेल्या साक्षीपुराव्याच्या आधारे सोमवारी न्यायाधीशांनी कॅप्टन सेल्वन, माजी नगरसेवक जसबिरसिंग बिरा,इंद्रपालसिंग मारवा, दर्शनबीर सिंग कोच्छर, गजानन पाटील या पाच जणांना दोषी ठरवले व तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. इतकेच नव्हे तर प्रत्येकी 13 हजार 500 रूपयांचा आर्थिक दंडही ठोठावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘ही माणसं फार निष्ठुर आहेत..’ राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना पाठवलेलं पत्र जसंच्या

दरम्यान आरोपात दोषी ठरल्यानंतर शिक्षेबाबत तुम्हाला काही सांगायचे आहे का? अशी विचारणा विशेष न्यायालयाने तमिळ सेल्वन यांना केली होती. यावेळी तमिळ सेल्वन यांनी आपण काही चुकीचे केले नाही, असे उत्तर दिले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT