Chandrashekhar Bawankule : “ठाकरे, राऊत यांचे अश्रू थांबले नाहीत, त्यामुळे…”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Chandrayan 3 : bjp president chandrashekhar bawankule recites to uddhav thackeray and sanjay Raut after shiv sena ubt criticised narendra modi and devendra fadnavis.
Chandrayan 3 : bjp president chandrashekhar bawankule recites to uddhav thackeray and sanjay Raut after shiv sena ubt criticised narendra modi and devendra fadnavis.
social share
google news

Uddhav Thackeray Chandrashekhar Bawankule Latest news : ‘पंतप्रधान मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे’, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने भाजपला लक्ष्य केले. त्यानंतर यावर भाजपकडून पलटवार करण्यात आलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊतांना लक्ष्य केले आहे.

ADVERTISEMENT

सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.”

“संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ जी शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही”, असा खोचक टोला बावनकुळेंनी ठाकरे आणि राऊतांना लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या डोळ्यात पाणी

“कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फडणवीस यांनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज (25 ऑगस्ट) त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मोदी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल”, असे बोल बावनकुळेंनी ठाकरेंना सुनावले आहेत.

वाचा >> Mood of the Nation: मविआ फोडली, पण महाराष्ट्रात भाजपला फक्त…

सामना अग्रलेखात काय?

ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटल आहे की, “पंतप्रधान मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे. चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळविले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की, ‘भारताने ऐतिहासिक यश मिळविले आहे. मात्र आता तेवढ्याने समाधान होणार नाही. आता सूर्य-शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल.’ पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. चंद्रानंतर देशाला त्यांनी शुक्रावर, सूर्यावर कदाचित धूमकेतूवरही उतरवून संशोधन करायचे ठरविले आहे. पंतप्रधानांचे लक्ष्य सूर्यावर उतरण्याचे आहे, पण देशातील 140 कोटी जनतेचे लक्ष्य महागाई, बेरोजगारी आहे”, असं टीकास्त्र ठाकरेंनी डागलं आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> Bhandara : मैत्रिणीला लॉजवर घेऊन गेला, अन् व्हायग्राच्या अतिसेवनाने…तरूणासोबत नेमकं काय घडलं?

“उठता बसता ‘शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे म्हणणारे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आता शेतकऱयांना पाठ दाखवून कुठे पळाले आहेत? या प्रश्नावर थेट जपानवरून ‘ट्वि ट्वि’ करणारेदेखील सोयिस्कर मौन का बाळगून आहेत?”, अशी टीका सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT