Chhatrapati Sambhajiraje: ‘लोकसभा लढवायची असेल तर…’ संभाजीराजेंसमोर ‘मविआ’ने ठेवली विचित्र अट!
राज्यसभेच्या खासदारकीवेळी छत्रपती संभाजीराजे यांनी ठाकरे गटाकडे जात त्यासाठी विचारणा केली होती, मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा मिळाला नव्हता, तर आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीकडे विचारणा केली असली तरी त्यांनी आता त्यांच्याकडे वेगळीच अट घातली आहे.
ADVERTISEMENT
Mahavikas Aghadi: राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अनेक मुद्यांनी ढवळून निघाले असतानाच आता लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) जोरदार वारे वाहू लागले आहेत. राज्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही आता कंबर कसली आहे. त्यातच स्वराज्य पक्षाचे (Swarajya Party) संस्थापक आणि कोल्हापूरचे माजी खासदार असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीवरून कोल्हापूरातील राजकारणही ढवळून निघाले आहे.
ADVERTISEMENT
पाठिंब्यावर विचारविनिमय
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आता कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी आता प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरातील ‘मविआ’कडूनही आता त्यांना आता एक अट घालण्यात आली आहे.
चेंडू संभाजीराजेंच्या कोर्टात
छत्रपती संभाजीराजे यांना कोल्हापूरातून लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडीमधील तीन पैकी कोणत्याही एका राजकीय पक्षात प्रवेश करण्याची अट घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता संभाजीराजे नेमका काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मागील वेळीही राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संभाजीराजे यांनी खासदारकीच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडे प्रयत्न केले होते, मात्र त्यावेळी शिवसेनेकडून पक्षाच्या अटी घातल्या गेल्याने त्यांनी संभाजीराजेंनी त्या मान्य केल्या नाहीत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Maratha Reservation: ‘भुजबळांच्या कंबरेत लाथा घालून…’ शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली!
‘मविआ’ची अट
छत्रपती संभाजीराजेंना महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्यासही तयार आहे, मात्र मविआने ज्या प्रमाणे अट घातली आहे, ती छत्रपती संभाजीराजे मान्य करणार की नाही हेच आता बघावे लागणार आहे.
सकारात्मक विचार
महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक प्रतिक्रिया असली तरी मविआने त्यांना म्हटले आहे की, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या राजकी पक्षापैकी कोणत्याही एका पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केला तर संभाजीराजेंची लोकसभेची उमेदवारी निश्चित समजली जाते आहे.
ADVERTISEMENT
सरप्राईज चेहरा
खासदार संभाजीराजे यांनी आपल्या उमेदवारीवासाठी महाविकास आघाडीकडे विचारणा केली असली तरी त्यांच्याबाबत घातलेली अट ते मान्य करणार का याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून सरप्राईज चेहरा असणार आहे अशी चर्चा केली जाते होत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार आता संभाजीराजे हाच ते कोल्हापूरच्या जागेसाठी चेहरा देऊ इच्छितात का असाही सवालही ते उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Kalyan : लव्ह, सेक्स आणि गर्भपात…, BJP च्या माजी नगरसेवकावर गुन्हा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT